
University : नगर : आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धाचे आयोजन व नियोजन करतांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीला येणाऱ्या विविध अडचणी बाबत योग्य ते नियोजन करून अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीला सहकार्य करण्याचे आश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी दिले.
हेही वाचा : रेशन दुकानात मोफत साडी मिळणार; ८७ हजार लाभार्थ्यांना फायदा
अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने सिनिअर महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. स्पर्धा आयोजन करतांना समितीस येणाऱ्या अडचणीबाबत प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल नियुक्त क्रीडा सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके उपस्थित होते.
या विषयांवर चर्चा (University)
चर्चेदरम्यान अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीस मिळणारा क्रीडा प्रो रेटा (निधी) पुणे जिल्हा, पुणे शहर आणि नाशिक यांच्या पेक्षा फार कमी जमा होत असल्याने क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी निधी कमी पडत आहे. इतर विभागाचा प्रो रेटा २५ ते ३० लाख रुपये जमा होतो तर अहिल्यानगर विभागाचा १६ लाखापर्यंत जमा होतो. त्यामुळे मोठी तफावत निर्माण होत असल्यामुळे खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधा, स्पर्धा आयोजन करताना स्पर्धा निधी, पंच निधी फार कमी उपलब्ध होत आहे. विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या चारही झोनचा निधी जर समप्रमाणात जमा झाला तर इतर झोन प्रमाणेच अहिल्यानगर विभागाला अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्यामध्ये वाढ करण्यात यावी किंवा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी विद्यापीठाने १० लाख विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.
नक्की पाहा : अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण संचालक हे पद भरले न गेल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक नाही त्याठिकाणी त्वरित ते पद भरण्यासाठी आपण सांगावे. त्याचप्रमाणे इतर विषयाच्या प्राध्यापक प्रमाणे महाविद्यालयातील ग्रँटटेबल पोस्ट भरत नाहीत तोपर्यंत इतर विषय शिक्षकांप्रमाणे शासन नियमानुसार व विद्यापीठ नियमानुसार जो पगार दिला जातो त्याच पद्धतीने शारीरिक शिक्षण संचालक हे पद नियमित भरत नाहीत तोपर्यंत सी एच बी ग्रँटटेबलचा पगार देऊन तात्पुरत्या स्वरूपात हे पद भरण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सकारात्मक भूमिका (University)
या मागणीला सकारात्मक भूमिका कुलगुरू काळकर यांनी घेतली. त्याच प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयानी अद्यापपर्यंत प्रोरेटा (क्रीडा निधी) जमा केला नाही त्याच्यावर विद्यापीठ पातळीवर पत्र पाठवून लवकर भरण्यासाठी सांगितले जाईल, अन्यथा सम्बधित महाविद्यालयावर कडक कारवाई सुरू केली जाईल, असे सांगितले. यावेळी अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. राजेंद्र देवकाते माजी सचिव डॉ. विजय म्हस्के, माजी सचिव डॉ. राहुल भोसले, डॉ.सेविओ वेगास, डॉ.नितीन वाळुंज, डॉ. सतीश चोरमले, प्रा.विलास एलके, डॉ. रवी काळाणे, प्रा.आण्णा मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.


