Monika Rajale : पाथर्डी : शिक्षकी पेशा हा समाजातील सर्वात उच्च स्थानाचा असून, याच माध्यमातून नव्या पिढीची पायाभरणी होत असते. विद्यार्थ्यांचा विकास (Student Development), संस्कार आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य शिक्षक (Teacher) करत असतात. शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी केले.
नक्की वाचा : बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजागृती
शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील
पाथर्डी तालुक्यातील जि.प. शाळा, जगदंबावस्ती येथे प्राथमिक शिक्षक बाळासाहेब यशवंत गोल्हार यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. आमदार राजळे पुढे म्हणाल्या की, बाळासाहेब गोल्हार हे प्रामाणिक व प्रेरणादायी शिक्षक असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या घडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून शालेय गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांसोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ॲड.ढाकणे म्हणाले, जि.प. शाळेतील शिक्षकांचे योगदान अधोरेखित करत, आज आपण जे काही आहोत त्यामागे शिक्षकांची शिस्त व प्रेरणा महत्त्वाची असल्याचे सांगितले. अशा शिक्षकांचा योग्य सन्मान व्हावा.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अनावश्यक कामे कमी करण्यासाठी प्रयत्न (Monika Rajale)
डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या खास विनोदी शैलीत शिक्षकांवर येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या आणि अशैक्षणिक कामांचा समाचार घेतला. शिक्षकांवरील वाढता ताण लक्षात घेता संघटनात्मक पातळीवर लवकरच शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन अनावश्यक कामे कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब गोल्हार यांनी ३५ वर्षांच्या सेवाकाळाचा आढावा घेतला. शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकी जपत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत, तसेच गरजू महिलांसाठी दिवाळी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारल्याचे त्यांनी सांगितले.
यांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेंद्र जायभाय, सिताराम सावंत, राजेंद्र गर्जे, गहिनीनाथ शिरसाट, शेषराव पाखरे, रामप्रसाद आव्हाड, शिवाजी ढाकणे, हुमायून आतार, बाळासाहेब खेडकर, राजेंद्र गोल्हार, अण्णा आंधळे, सुनील खेडकर, शशिकांत जायभाये, सुनिल ढाकणे, संजय कीर्तने, महादेव आव्हाड, अरविंद जाधव, संतोष पालवे, राजू गोल्हार, महादेव गोल्हार, अशोक कराड यांनी परिश्रम घेतले. राजेंद्र जायभाये यांनी प्रास्ताविक केले, आरिफ बेग यांनी सूत्रसंचालन केले, तर रामकिसन वाघ यांनी आभार प्रदर्शन मानले.
यावेळी एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, विस्तार अधिकारी शिवाजी कराड, रामनाथ कराड, अनिल भवर, अशोक आंधळे, भागिनाथ बडे, निलेश क्षीरसागर, भीमराव फुंदे, मंगल कोकाटे, जीएसटी उपायुक्त भगवान उंडे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब घुगे, सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे, विक्रीकर अधिकारी निवृत्ती शिरसीम, मृत्यूजय गर्जे, नंदकुमार शेळके, दिपक देशमुख, काशीबाई गोल्हार, महेंद्र शिरसाठ, संजय देशमुख, डॉ. राजेंद्र खेडकर, जिल्हा शिक्षक नेते राया औटी, संजय धामणे, विजय अकोलकर, सुरेश मिसाळ, छबुराव फुंदेश, कल्याण लवांडे, बाळकृष्ण कंटाळी, बाबा आव्हाड, अंबादास गारुडकर, विठ्ठल वराळे, संतोष डमाळे, राजाभाऊ बेहळे, सुनील आडसूळ, भागवत खेडकर, संजय शिंदे, कल्याण ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.



