Women’s Empowerment : वासुंदे येथे महिला सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिर

Women's Empowerment : वासुंदे येथे महिला सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिर

0
Women's Empowerment : वासुंदे येथे महिला सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिर
Women's Empowerment : वासुंदे येथे महिला सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिर

Women’s Empowerment : पारनेर : महिला खऱ्या अर्थाने समाजाच्या मुख्य आधारस्तंभ आहे आणि तिला समाजामध्ये योग्य सन्मान मिळणे ही काळाची गरज आहे. महिला सक्षमीकरण (Women’s Empowerment) ही केवळ संकल्पना न राहता ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. असे मत वासुंदे (Vasunde) गावच्या सरपंच विमल झावरे (Vimal Zhavare) यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा : पाथर्डीत कंटेनरवरील ताबा सुटल्याने अपघात; प्रवेश कमानीसह घरांचे नुकसान

विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित

वासुंदे ग्रामपंचायत अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेले विशेष मार्गदर्शन शिबिर शुक्रवार (ता, १७) मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन वासुंदे गावच्या सरपंच विमल झावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वासुंदे येथील महिला अंगणवाडी सेविका, वैद्यकीय मदतनीस तसेच पारनेर शहरातील शिक्षण शास्त्र विद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या विशेष शिबिरामध्ये महिलांच्या दैनंदिन जीवनातील विविध प्रश्नांवर आणि समस्यांवर सविस्तर चर्चा व विनिमय करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

झावरे म्हणाल्या की (Women’s Empowerment)

​विमल झावरे यांचे महिलांच्या उन्नतीसाठी सुरू असलेले सामाजिक काम हे इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरपंच विमल झावरे म्हणाल्या की, आजची स्त्री ही घराचा गाडा चालवण्यासोबतच सामाजिक जबाबदारीही समर्थपणे पेलत आहे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातील

वासुंदे ग्रामपंचायत नेहमीच महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, आगामी काळातही महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील. जोपर्यंत महिला आर्थिक आणि वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत समाजाची खरी प्रगती होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमा प्रसंगी रूपवर्षा भालेराव, प्रियांका भामरे, पार्वती कारंडे, सुप्रिया गोरे, करिष्मा शेख, अपेक्षा जऱ्हाड, अश्विनी रोहकले यांच्यासह वासुंदे परिसरातील अनेक महिला भगिनी व युवती उपस्थित होत्या