Accident : पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी (Manikdaundi) येथे आज (ता. १८) दुपारी एक भीषण अपघात (Accident) घडला. पाथर्डीहून बारामतीकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरवरील (Container) चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने थेट स्वागत कमानीला धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की कमान पूर्णपणे कोसळली.
नक्की वाचा : रामदास पुजारी ‘आत्मसन्मान गौरव पुरस्काराने सन्मानित

कोणतीही जीवितहानी नाही
अपघातानंतर अनियंत्रित झालेल्या कंटेनरने शेजारील तीन घरांना धडक दिल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. काही घरांच्या भिंतींना तडे जाऊन पडझड झाली आहे. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, कंटेनर चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वाहतूक पूर्णपणे ठप्प (Accident)
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जमाव करून चालकाला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातानंतर कंटेनर रस्त्यावर आडवा उभा राहिल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नंतर वाहन हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



