Mahatma Phule Jayanti : पारनेर : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती (Mahatma Phule Jayanti) वर्षानिमित्त, समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी, आपला आठवा वर्धापनदिन साजरा करत असलेला संघर्षनायक मीडिया (Sangharshanayak Media), पँथर आर्मी व स्वराज्य क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींना विविध पुरस्कारांनी (Awards) सन्मानित करण्यात आले.
नक्की वाचा : युवकाकडून लग्नासाठी दबाव; तरुणीने विष प्राशन करुन स्वत:ला संपवले
आत्मसन्मान गौरव पुरस्कार देऊन गौरव
सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात निवृत्त वनाधिकारी, कवी, लेखक रामदास पुजारी यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१० सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार (Mahatma Phule Jayanti)
याप्रसंगी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची पताका खांद्यावर घेऊन लढणाऱ्या, समाजाच्या विविध घटकांतील काही मान्यवरांना ‘ संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार ‘देऊन गौरविण्यात आले. २७ मान्यवरांना ‘आत्मसन्मान गौरव पुरस्कार’, १८ समाजसेवकांना ‘आदर्श समाजभूषण पुरस्कार ‘तर १० सरपंचांना’ आदर्श सरपंच पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात आले.



