
Caesarean Delivery : जगातील सर्वात कठीण पण सर्वात आनंदाची नोकरी कोणती? जिथे पगार नसतो, सुट्टीही नसते, पण मिळणारा आनंद हा अफाट असतो. असा प्रश्न जर तुम्हाला पडला तर त्याच उत्तर आहे,’मातृत्व’. ‘आई’ होणं हे एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर वळण असतं. ‘प्रेग्नन्सी’ (Preganancy) हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यात अनेक बदल घेऊन येणारा खास क्षण असतो.
या बदलांमधील काही बदल हे महिलांना आवडतात तर काही अगदीच नकोसे वाटतात, असाच एक बदल म्हणजे वाढलेलं वजन. सिझेरियन डिलिव्हरीनंतर (Caesarean Delivery) पोटावरील वाढलेली चरबी (Excess Belly Fat) कमी करणे हा अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय ठरतो. त्यामुळे डिलिव्हरीनंतर लगेचच बेली फॅट कसे कमी करावे,(How To Reduce Belly Fat) याचा विचार अनेक महिला करू लागतात.
नक्की वाचा: अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; पोलिसांना दिले निर्देश
अनेकदा सिझेरियननंतर वाढलेले पोट कमी करण्यासाठी महिला घाईघाईने कडक डाएट किंवा हेव्ही एक्सरसाइज सुरू करण्याचा विचार करतात.मात्र अशा वेळी चुकीच्या पद्धतीचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र डिलिव्हरी नंतर शरीराला कोणताही ताण न देता, सुरक्षितपणे पोटाचा घेर कमी कसा करायचा? हे आज समजून घेऊ..
अवश्य वाचा: दुसऱ्या लग्नाच्या मोहात हातात पडली बेडी; पहिले लग्न लपवणाऱ्या अभियंत्याचा बनाव उघड
सिझेरियन डिलिव्हरी नंतर पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपाय?
१. डॉक्टरांचा सल्ला घ्या :- सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया असते, त्यामुळे यातून सावरण्यासाठी लागणारा वेळ ‘नॉर्मल डिलिव्हरी’च्या तुलनेत थोडा जास्त असतो. सामान्यतः शस्त्रक्रियेनंतर पहिले ६ ते ८ आठवडे कोणताही जड व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक महिलेच्या शरीराची रिकव्हरी होण्याची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे कोणताही व्यायाम किंवा डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला टाके घातलेल्या जागी वेदना, सूज किंवा कोणताही त्रास जाणवत असेल, तर त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधा.
२. वॉकिंग :- सिझेरियन डिलिव्हरीनंतर काही आठवड्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हलके वॉक सुरू करू शकता. सुरुवातीला दररोज १५ ते २० मिनिटे संथ गतीने चालावे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते,मन प्रसन्न राहायला सुरवात होते आणि हळूहळू कॅलरीज जळण्यास मदत होते. जसा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि शरीर साथ देईल, तसा तुम्ही चालण्याचा वेळ आणि वेग वाढवू शकता. पोटावर किंवा टाक्यांवर कोणताही अतिरिक्त ताण न पडता वजन कमी करण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे.
३. प्रसूतीनंतरचे सोपे व्यायाम करणे :- सी-सेक्शन नंतर लगेचच पोटाचे हेव्ही एक्सरसाईज जसे की सिट-अप्स किंवा क्रंचेस सुरू करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरू शकते. त्याऐवजी आपण प्रसूतीनंतरच्या हलक्या एक्सरसाइजने दिवसाची सुरुवात करू शकता. दीर्घ श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेमुळे पोटाचे स्नायू हळूहळू अॅक्टिव्ह होऊ लागतात. हे एक्सरसाइज केल्याने ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची अंतर्गत शक्ती सुधारण्यास मदत होते.
४. संतुलित आणि पौष्टिक आहार :- सी-सेक्शन नंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा ‘क्रॅश डाएट’ म्हणजेच कठोर आहार घेणं हे पूर्णपणे चुकीचे आहे, विशेषतः जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल. तर तुमच्या शरीराला शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी आणि दूध निर्मितीसाठी पुरेशा पोषणाची गरज असते. आपल्या नेहमीच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजेच स्नायूंच्या मजबुतीसाठी डाळी, पनीर खायला हवं, फायबर मिळवण्यासाठी फळे व पालेभाज्या खाव्यात. सुका मेवा आणि ओमेगा-३ युक्त पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात समावेश करावा,आणि पुरेसे पाणी प्यावे.
५. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या :- नव्याने आई झालेल्या महिलेसाठी झोप पूर्ण करणे, हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते, परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आराम नक्की करा. शरीरात झोपेची कमतरता असल्यास Hormonal Imbalance होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. तणाव हे देखील वजन वाढण्याचे किंवा पोटावर चरबी साचण्याचे एक मुख्य कारण असू शकते. त्यामुळे, मन शांत ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ ध्यान करा. हलके दीर्घ श्वसनाचे व्यायाम तणाव कमी करण्यास मदत करतात. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळेल आणि रिकव्हरी वेगाने होईल.
मातांनो सी-सेक्शन नंतर पोटाचा घेर कमी करणे ही एक सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी संयम आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वतःच्या शरीराची तुलना इतरांशी करू नका, कारण प्रत्येक स्त्रीची रिकव्हरी वेगळी असते. योग्य आहार, हलका व्यायाम आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन यांच्या मदतीने तुम्ही पुन्हा फिट होऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या काळात स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, म्हणजे बाळ आणि तुम्ही दोघेही खुश राहाल.


