Akshay Kardile : निराधारांना देण्यासाठी आधार; अक्षय कर्डिले हेच होणार आमदार

Akshay Kardile : निराधारांना देण्यासाठी आधार; अक्षय कर्डिले हेच होणार आमदार

0
Akshay Kardile : निराधारांना देण्यासाठी आधार; अक्षय कर्डिले हेच होणार आमदार
Akshay Kardile : निराधारांना देण्यासाठी आधार; अक्षय कर्डिले हेच होणार आमदार

ब्राम्हणी येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक संपन्न

Akshay Kardile : राहुरी : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी (Brahmani) येथे संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) समितीच्या वतीने लाभार्थ्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ, सरपंच सौ. सुवर्णाताई बानकर तसेच उपसरपंच महेंद्र तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नक्की वाचा : बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

समितीच्या माध्यमातून हजारो गरजूंना योजनांचा लाभ

बैठकीत संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. समितीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील हजारो गरजू, निराधार, विधवा, अपंग व वयोवृद्ध नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अक्षय कर्डिलेंना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त (Akshay Kardile)

यावेळी लाभार्थ्यांनी समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत “निराधारांना देण्यासाठी आधार, अक्षय कर्डिले (Akshay Kardile) होणार आमदार” असा ठाम निर्धार व्यक्त केला. लाभार्थ्यांनी सांगितले की, योजनांचा लाभ वेळेवर मिळाल्याने त्यांच्या अडचणी कमी झाल्या असून या कार्यामागील नेतृत्वाबद्दल त्यांना विश्वास आहे.

अध्यक्ष विनीत धसाळ यांनी सांगितले की, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने राहुरी तालुक्यात सुमारे २२०० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. ब्राम्हणी गावातही सुमारे ३०० लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून हे कार्य पुढेही सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले.

सरपंच सौ.सुवर्णाताई बानकर यांनी सांगितले की, गावातील सर्वसामान्य नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे मोठे योगदान आहे. या कार्याची जाणीव लाभार्थ्यांना असून, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपसरपंच महेंद्र तांबे यांनी सांगितले की, संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या बैठकीस योजनेचे लाभार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत समितीच्या कार्याचा गौरव करण्यात येत लाभार्थ्यांनी एकमुखाने पाठिंबा दर्शविल्याचे चित्र पाहायला मिळाले.