Theft: राजूर येथे चोरी केलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली

0

Theft:अकोले: तालुक्यातील राजूर येथील एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील सुमारे 3 लाख 86 हजार 500 रुपयांच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरुन (Theft) धूम ठोकणार्‍या चार चोरट्यांना गजाआड करण्यात अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला यश आले आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की 3 ऑक्टोबर, 2025 रोजी राजूर येथील कुटुंब नियमित तपासणीकरीता घराला कुलूप लावून मुंबई येथे जावून परत आले असता दरम्यानच्या काळात अज्ञात आरोपींनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करुन 3 लाख 86 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व दोन हजार रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेल्याबाबत राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी श्रीरामपूर भागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार पथकाने शोध घेतला असता हा गुन्हा किसन उर्फ किशोर शिवाजी बर्डे (वय 20, रा. टाहाकरी ता. अकोले) याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले.

अवश्य वाचा- पाथर्डीत कंटेनरवरील ताबा सुटल्याने अपघात; प्रवेश कमानीसह घरांचे नुकसान

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली (Theft)

सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे श्रीरामपूर येथे आले असल्याची गोपनीय माहिती मिळताच कर्मवीर चौक परिसर येथे किसन उर्फ किशोर शिवाजी बर्डे, अमोल गोरख मेंगाळ (वय 20, रा. केळी ता. अकोले), श्याम शंकर मधे (वय 24, रा. पाडाळणे, ता. अकोले) असे मिळून आले. त्यांना विश्‍वासात घेवून विचारपूस केली असता हा गुन्हा त्यांचे इतर साथीदार लक्ष्मण बाळू रोकडे, विजय कैलास जाधव (दोघेही रा. टाहाकरी, ता. अकोले, दोघेही फरार) यांच्यासह केला असल्याची कबुली दिली. सदर आरोपींनी अशाचप्रकारचे गुन्हे राजूर पोलीस ठाणे हद्दीत केल्याचे कबुल केले असून पुढील तपास राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खांडे, पोहेकॉ. दादासाहेब लोंढे, संदीप दरंदले, संतोष दरेकर, सचिन धनाड, पोना. रामेश्‍वर वेताळ, पोकॉ. अशोक गाढे तसेच राजूर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. श्रीकांत नरोडे, यमना जाधव, पोकॉ. सुनील रत्नपारखी, संभाजी सांगळे यांनी केली आहे.