Theft: गर्दीचा फायदा घेत मढी येथे दागिने व मोबाईलची चोरी 

आरतीच्या वेळी कानिफनाथ गडावर प्रचंड गर्दी

0

Theft: पाथर्डी: तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे अमावस्येनिमित्त नाथ भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भाविकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल चोरी (Theft)केल्याची घटना घडल्या आहेत. या प्रकारामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून देवस्थान व पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. १७ एप्रिल रोजी अमावस्येनिमित्त मढी येथे हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. याच गर्दीत चोरट्यांनी संधी साधत तीन वेगवेगळ्या महिलांच्या गळ्यातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

अवश्य वाचा-  पाथर्डीत कंटेनरवरील ताबा सुटल्याने अपघात; प्रवेश कमानीसह घरांचे नुकसान

आरतीच्या वेळी कानिफनाथ गडावर प्रचंड गर्दी (Theft)

या सर्व घटनांमध्ये चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत कौशल्याने दागिने चोरल्याचे दिसून येत आहे. विशेषतः आरतीच्या वेळी कानिफनाथ गडावर प्रचंड गर्दी होत असल्याने चोरट्यांना संधी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अनेक नाथ भक्तांचे मोबाईल फोनही चोरीला गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण असून अशा घटना दरवर्षी घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मढी देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे  गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.