Jamkhed Crime : चोरट्याचा गेम ओव्हर! चोरी करायला आलेल्या चोरट्याला महिलेनेचं पकडले

0
Jamkhed Crime : चोरट्याचा गेम ओव्हर! चोरी करायला आलेल्या चोरट्याला महिलेनेचं पकडल
Jamkhed Crime : चोरट्याचा गेम ओव्हर! चोरी करायला आलेल्या चोरट्याला महिलेनेचं पकडल

नगर: एका बाजूला चोरीचा डाव, तर दुसऱ्या बाजूला महिलेचं धाडस! जामखेडमध्ये चोरीच्या (Jamkhed Crime) उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याला एका महिलेने चक्क रंगेहात पकडलं आहे. (A woman actually caught a thief red-handed) जामखेड तालुक्यातील आघी येथे सोमवारी २० एप्रिलला पहाटे साडेतीनच्या सुमारास घराच्या पडवीत झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला महिलेनेच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोपट मारुती तेरकर यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर भगवान काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा: गॅस सिलिंडरसाठी सरकारने आणला नवा नियम ; वाचा काय आहे तो नवा नियम?

नेमकं काय घडलं? (Jamkhed Crime)

१९ एप्रिल रोजी रात्री फिर्यादीच्या पत्नी या आपल्या घराच्या पडवीमध्ये झोपल्या होत्या, तर त्यांचे पती हे घरामध्ये झोपले होते. याच दरम्यान २० एप्रिलला पहाटे साडेतीन वाजता त्यांच्याच गावातील असलेला आरोपी ज्ञानेश्वर भगवान काळे हा त्यांच्या घरात शिरला आणि फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीच्या पत्नी यांना हाताचा स्पर्श झाल्याने त्यांना लगेच जाग आली आणि प्रसंगावधान दाखवत त्यांनी आरोपीच्या डोक्याचे केस पकडून त्याला धरून ठेवले आणि आरडाओरडा करून मदत मागितली. यानंतर घरातील नातेवाईक व ग्रामस्थांनी आरोपीला पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

अवश्य वाचा: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतकऱ्याचा काम करताना दुर्दैवी अंत

महिलेने दाखवलं धाडस (Jamkhed Crime)

या घटनेचा सखोल तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जितेंद्र सरोदे करीत आहेत. या महिलेने दाखवलेलं धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. संकटाच्या वेळी न डगमगता त्यांनी ज्या प्रकारे चोराचा सामना केला, तो आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे.