Protest : भातोडी पारगावात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; ग्रामस्थ आक्रमक

भातोडी पारगावमध्ये महिलांची आजही पाण्यासाठी भटकंती

0
Protest : भातोडी पारगावात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; ग्रामस्थ आक्रमक
Protest : भातोडी पारगावात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; ग्रामस्थ आक्रमक

Protest : नगर : तालुक्यातील भातोडी पारगाव येथे केंद्र सरकारची (Central Government) महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना (Jal Jeevan Mission Scheme) प्रत्यक्षात अपयशी ठरत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. गावातील नळ कोरडे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आणि नागरिक पाण्यासाठी त्रस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी आज (ता. २२) पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन (Protest) करत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

नक्की वाचा : युवकाकडून लग्नासाठी दबाव; तरुणीने विष प्राशन करुन स्वत:ला संपवले

सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा

गेल्या दोन वर्षांपासून गावात नियमित पाणीपुरवठा सुरू व्हावा यासाठी सरपंच विक्रम गायकवाड यांनी गावकऱ्यांसह सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही योजना अद्याप अपूर्णच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.आज (ता. २२) आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत जल जीवन मिशन योजनेचा निषेध नोंदवला व तत्काळ काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भातोडी पारगावमध्ये महिलांची आजही पाण्यासाठी भटकंती (Protest)

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, “आठ दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर जिल्हा परिषद कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल.”तसेच सरपंच विक्रम गायकवाड यांनीही कठोर भूमिका घेत, “लवकरात लवकर योजना पूर्ण झाली नाही तर टोकाचा निर्णय घ्यावा लागेल,” असा इशारा दिला. “हर घर जल” या योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा असला, तरी भातोडी पारगावमध्ये महिलांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.