District Treasury Office : आनंदी जीवन या व्याख्यानास जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा उस्फूर्त प्रतिसाद

0

District Treasury Office : नगर : सध्याच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या युगामध्ये मानवाचे जीवनमान गतिमान झालेले आहे. निसर्गाच्या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीमध्ये मानव हा एकमेव बुद्धिजीवी जीव आहे असं आपण मानतो. परंतु सुख-समृद्धीच्या गराड्यात अडकलेल्या आणि तथाकथित प्रगतीच्या हव्यासाने झपाटलेल्या मानवाला आता मात्र स्वतःचाच विसर पडलेला आहे. भौतिक वस्तूच्या सुख-समृद्धीमध्ये मानव आपली मन: शांती हरवून बसलेला आहे. जगामधील कितीही मौल्यवान व महागड्या भौतिक वस्तूंचा उपभोग घेऊ द्या. परंतु शांत झोप, सुखी आणि समाधानी, निरोगी जीवन (Healthy Life) हेच खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाचा मुलमंत्र आहे. असे प्रतिपादन लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केले आहे.

District Treasury Office : आनंदी जीवन या व्याख्यानास जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा उस्फूर्त प्रतिसाद
District Treasury Office : आनंदी जीवन या व्याख्यानास जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा उस्फूर्त प्रतिसाद

नक्की वाचा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा आढावा

अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित

अहिल्यानगर येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील (District Treasury Office) अधिकारी व कर्मचारी यांना “जीवनातील तान तणावापासून मुक्ती व आनंदी जीवन” या विषयावर लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी व्याख्यान दिले. याप्रसंगी जिल्हा कोषागार कार्यालयाचे अप्पर कोषागार अधिकारी कुशाबा पिसे, रविंद्र काजळकर, संतोष ताठे, राजकुमार पुंड सहाय्यक कोषागार अधिकारी (नेवासा)व ओ.एस सुधीर देशपांडे आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पुढे बोलताना वारकड म्हणाले, (District Treasury Office)

संत ज्ञानेश्वर माऊली, हिंदवी स्वराज्य चे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्शवादी व्यक्तींच्या विचारांचा सांस्कृतिक वारसा जोपासावा व हीच आदर्शवादी शिकवण येणाऱ्या भावी पिढीला द्यावी. व त्यांचे विचार अंगी जोपासावेत. असे आवाहन दत्तात्रय वारकड (Dattatraya Warkad) यांनी उपस्थितांना केले.

जीवनात नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक, प्रभावी, बलाढ्य आणि बळकट स्वरूपाची विचारसरणी अंगीकारणे काळाची गरज आहे. सोशल मीडिया, मोबाईलचा अतिरिक्त वापर, व धावपळीचे जीवन याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कळत नकळत विघातक स्वरूपाचा परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत न डगमगता जीवनात येणाऱ्या आव्हानांना सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे.

“असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर”या कवी कुसुमाग्रज यांच्या प्रेरणादायी कवितेचा दाखला देत सर्व उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वक्ते दत्तात्रय वारकड यांनी मिळवला.श्रोत्यांनी देखील प्रचंड टाळ्यांनी मनमुराद प्रतिसाद दिला व या प्रेरणादायी व्याख्यानाचा आनंद लुटला.

आनंदी जीवन म्हणजे आयुष्याचा आनंदोत्सव होईल परंतु याकरिता आपण आपल्या जीवनामध्ये जर स्थैर्य हवे असेल तर धैर्य धरावेच लागेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली घनवट यांनी केले. तर मयूर सूर्यपुजारी यांनी आभार मानले.