Rahata Municipal Council : राहाता : पोलादी पुरूष सरदार वल्लभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी नागरीसेवा दिन साजरा केला जातो. राहाता पालिकेतील (Rahata Municipal Council) मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज (ता. २२) पालिकेत नागरीसेवा दिनाचे आयोजन करण्यात आले. असे प्रतिपादन नगराध्यक्ष डाॅ. स्वाधीन गाडेकर (Dr. Swadhin Gadekar) यांनी केले.
नक्की वाचा : भातोडी पारगावात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; ग्रामस्थ आक्रमक
विखे पाटील यांच्या सुचनेवरून या उपक्रमाचे आयोजन
या निमीत्ताने मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह विविध खाते प्रमुख व कर्मचा-यांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. डाॅ.गाडेकर म्हणाले, पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सुचनेवरून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे तत्परतेने करावीत आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी असा हेतू या उपक्रमा मागे आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांची उपस्थिती (Rahata Municipal Council)
यावेळी उपनगराध्यक्ष डाॅ.विजय सदाफळ, गटनेते मुन्ना शाह यांच्यासह पालिकेतील नगरसेवक, बांधकाम सभापती अजय आग्रे, पाणीपुरवठा सभापती नितीन गाडेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती अर्चना निकाळे, महिला व बालकल्याण सभापती अनिता शेळके, नगरसेवक राहुल सदाफळ, दशरथ तुपे, नगरसेविका सविता सदाफळ, ॲड. मयुर पाळंदे, प्रविण रुणवाल, अक्षय बोठे, विजय गिधाड, साहेबराव निधाने, मनिष चितळकर आदी उपस्थित होते.



