Fraud : सेनापती बापट मल्टिस्टेटच्या ठेवीदारांचा एल्गार; उद्या विजय औटींच्या घरासमोर उपोषण

Fraud : सेनापती बापट मल्टिस्टेटच्या ठेवीदारांचा एल्गार; उद्या विजय औटींच्या घरासमोर उपोषण

0
Fraud : सेनापती बापट मल्टिस्टेटच्या ठेवीदारांचा एल्गार; उद्या विजय औटींच्या घरासमोर उपोषण
Fraud : सेनापती बापट मल्टिस्टेटच्या ठेवीदारांचा एल्गार; उद्या विजय औटींच्या घरासमोर उपोषण

Fraud : पारनेर : पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी मोकाट असल्याने, या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करावी आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी येत्या गुरुवारी २३ एप्रिल २०२६ रोजी संस्थापक माजी आमदार विजय औटी यांच्या निवासस्थानासमोर पारनेर बाजार तळावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.

हेही वाचा : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या बदलीसाठी विशिष्ट समाजाचे प्रयत्न?; पोलिसांच्या धडाकेबाज कारवायांना वेग

काय आहे प्रकरण? (Fraud)

पारनेर तालुक्यातील हजारो गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या ठेवी हडप करणाऱ्या सेनापती बापट मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या विरोधात आता ठेवीदारांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन पाठवून परवानगीची मागणी करण्यात आली आहे. ​सेनापती बापट मल्टिस्टेट सोसायटीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६३/२०२५ अन्वये महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायदा (MPID) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. संस्थेच्या २९ शाखांमधून शेकडो कोटींच्या ठेवी जमा करण्यात आल्या होत्या. मात्र, ठेवींची मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याने सर्वसामान्य ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ज्येष्ठांच्या औषधोपचाराचा आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असून ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींचे जामीन फेटाळले असतानाही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.

नक्की पहा : अहिल्यानगर जिल्ह्यातील ३८४४ रुग्णांना मिळाली ३१ कोटी १९ लाखांची मदत

प्रशासक नियुक्त करा (Fraud)

​या निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे की, मुख्य आरोपी फरार असून उच्च न्यायालयात तपास यंत्रणेने योग्य बाजू न मांडल्यामुळे काही आरोपींना जामीन मिळाला आहे. हे आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना पोलीस मात्र हतबल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ठेवीदारांनी मागणी केली आहे की, या संस्थेचे तात्काळ फोरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून आर्थिक अफरातफरीची नेमकी रक्कम समोर येईल. तसेच, संस्थेच्या आणि सर्व माजी व विद्यमान संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून त्यातून ठेवीदारांची देणी अदा करावीत. या आंदोलनाद्वारे राज्य शासनाच्या गृह विभागाकडे संस्थेवर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पाठवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत होणारे हे उपोषण शांततामय आणि सनदशीर मार्गाने केले जाणार असून, जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संतप्त ठेवीदारांनी दिला आहे.