Sina River Clean-up Campaign : सीना नदी स्वच्छता अभियान उत्साहात; जलसंपदा व मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग 

३५ ते ४० अधिकारी व कर्मचारी सहभागी

0

Sina River Clean-up Campaign : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) जलव्यवस्थापन (Water Management) कृती पधंरवडा-२०२६ अंतर्गत धरण, कालवा स्वच्छता अभियान, नदी प्रदूषण नियंत्रण व पांदन रस्ता दुरुस्ती कार्यक्रमाचा भाग म्हणून सकाळी ७ ते ९ या वेळेत अहिल्यानगरमध्ये सीना नदी स्वच्छता अभियान (Sina River Clean-up Campaign) यशस्वीपणे राबविण्यात आले.

नक्की वाचा : कत्तलीसाठी चाललेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; ६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Sina River Clean-up Campaign : सीना नदी स्वच्छता अभियान उत्साहात; जलसंपदा व मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग 
Sina River Clean-up Campaign : सीना नदी स्वच्छता अभियान उत्साहात; जलसंपदा व मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग 

३५ ते ४० अधिकारी व कर्मचारी सहभागी

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बा. क. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान झाले. अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभाग व प्राधिकरण कार्यालय यांच्यामार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जलसंपदा विभागातील मंडळांतर्गत व विभागांतर्गत जवळपास ३५ ते ४० अधिकारी व कर्मचारी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Sina River Clean-up Campaign : सीना नदी स्वच्छता अभियान उत्साहात; जलसंपदा व मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग 
Sina River Clean-up Campaign : सीना नदी स्वच्छता अभियान उत्साहात; जलसंपदा व मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग 

स्वच्छता मोहिमेला महानगरपालिकेचीही साथ (Sina River Clean-up Campaign)

मोहिमेत प्रामुख्याने सहाय्यक अधीक्षक अभियंता ओ. अं. भंडारी, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपकार्यकारी अभियंता यू. व्ही. कंगणकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता भूषण उबाळे व उपविभागीय अधिकारी इंद्रजीत यादव यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या स्वच्छता मोहिमेला अहिल्यानगर महानगरपालिकेचीही साथ मिळाली. मनपाचे ७ कर्मचारी व २ घंटा गाड्या सदर उपक्रमासाठी उपस्थित होत्या. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सीना नदी पात्रातील गोळा केलेला कचरा उचलून तो कचरा डेपोमध्ये पोहोचविण्यात आला.