Flex : पारनेर नगरपंचायतीचा धडाकेबाज पवित्रा; शहरात अनधिकृत फ्लेक्सवर कडक कारवाई

Flex : पारनेर नगरपंचायतीचा धडाकेबाज पवित्रा; शहरात अनधिकृत फ्लेक्सवर कडक कारवाई

0
Flex : पारनेर नगरपंचायतीचा धडाकेबाज पवित्रा; शहरात अनधिकृत फ्लेक्सवर कडक कारवाई
Flex : पारनेर नगरपंचायतीचा धडाकेबाज पवित्रा; शहरात अनधिकृत फ्लेक्सवर कडक कारवाई

Flex : पारनेर : शहरातील विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि रहदारीला अडथळा ठरणारे अनधिकृत फ्लेक्स व पाट्या काढण्यासाठी पारनेर नगरपंचायतीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नगरपंचायत मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (ता. २३) रोजी सकाळी ११ वाजेपासून विशेष पथकाने शहराच्या विविध भागांत अचानक धडक देत अनधिकृत फ्लेक्सवर कायदेशीर कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिकांनी दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरातीचे फलक लावले होते. यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत होती, तसेच शहराच्या सौंदर्यालाही बाधा येत होती. याची दखल घेत मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांनी अनधिकृत पथकासह आज धडक कारवाई मोहीम हाती घेतली.

हेही वाचा : अन्यथा २७ एप्रिलपासून बेमुदत बंद; पाथर्डीतील कृषी विक्रेत्यांचा इशारा

व्यावसायिकांचा तीव्र संताप

नगरपंचायतीच्या पथकाने हनुमान मंदिर परिसर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक चौक, ऋषिकेश हॉटेल परिसर, बँक ऑफ महाराष्ट्र आणि परिधान कलेक्शन यांसह वर्दळीच्या ठिकाणचे अनधिकृत फ्लेक्स व पाट्या जप्त केल्या. तसेच, खरेदी संघाच्या इमारतीवर अनेक दिवसांपासून डोलणारा अनधिकृत फ्लेक्सही प्रशासनाने काढून टाकला. नगरपंचायतीने अचानक केलेल्या या कारवाईमुळे काही व्यावसायिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कारवाई सुरू असताना स्थानिक नागरिक भाऊसाहेब चौरे आणि मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि सरकारी कामात अडथळा येऊ नये, यासाठी तातडीने पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने आपली कारवाई पूर्ण केली.

नक्की पहा : भर उन्हात वृद्धांनी बजावला मतदानाचा अधिकार

नागरिकांकडून स्वागत (Flex)

शहरातील पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणे ही रहदारीसाठी आहेत, ती जाहिरातींसाठी नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापुढेही शहरात विनापरवाना किंवा रस्ते अडवून लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांनी दिला आहे. नगरपंचायतीच्या या धडक मोहिमेचे सुजाण नागरिकांकडून स्वागत होत असून, कारवाईमुळे शहराचा चेहरामोहरा काहीसा मोकळा झाला आहे. आता व्यावसायिक स्वतःहून अनधिकृत जाहिराती काढतात की प्रशासन पुन्हा धडक देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here