Dilapidated Roads : भूमिपूजनानंतरच रस्ता खराब; ४० लाखांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Dilapidated Roads : भूमिपूजनानंतरच रस्ता खराब; ४० लाखांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

0
Dilapidated Roads : भूमिपूजनानंतरच रस्ता खराब; ४० लाखांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
Dilapidated Roads : भूमिपूजनानंतरच रस्ता खराब; ४० लाखांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Dilapidated Roads : शेवगाव : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) नगर विकास अंतर्गत शेवगाव नगरपरिषद (Shevgaon Municipal Council) हद्दीत खालची वेस ते गेवराई रोड साठी सुमारे ४० लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भूमिपूजनानंतर काहीच काळात संबंधित रस्ता खराब (Dilapidated Roads) झाल्याचे समोर आले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

कामाच्या गुणवत्तेबाबत शंका

या कामाचा शुभारंभ मोठ्या अपेक्षेने करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असून रस्त्यावर ठिकठिकाणी तडे जाणे, खड्डे पडणे आणि पृष्ठभाग उखडणे असे प्रकार दिसून येत आहेत.

Dilapidated Roads : भूमिपूजनानंतरच रस्ता खराब; ४० लाखांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
Dilapidated Roads : भूमिपूजनानंतरच रस्ता खराब; ४० लाखांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न (Dilapidated Roads)

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असावे. त्यामुळे एवढ्या मोठ्या निधीचा वापर होऊनही रस्ता अल्पावधीतच खराब झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

त्यामुळे या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.