Crop Insurance : कर्जत-जामखेडमध्ये खरीप हंगाम 2025 साठी पात्र शेतकऱ्यांना पिक विमा वाटपास सुरुवात

Crop Insurance : कर्जत-जामखेडमध्ये खरीप हंगाम 2025 साठी पात्र शेतकऱ्यांना पिक विमा वाटपास सुरुवात

0
Crop Insurance : कर्जत-जामखेडमध्ये खरीप हंगाम 2025 साठी पात्र शेतकऱ्यांना पिक विमा वाटपास सुरुवात
Crop Insurance : कर्जत-जामखेडमध्ये खरीप हंगाम 2025 साठी पात्र शेतकऱ्यांना पिक विमा वाटपास सुरुवात

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

प्रमुख पिकांचे झाले होते मोठे नुकसान

जामखेड तालुक्यात खरीप २०२५ हंगामात उडीद व सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानुसार ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उडीद पिकासाठी सुमारे ६ कोटी ५ लाख ८७ हजार रुपये, तर सोयाबीन पिकासाठी सुमारे ११ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपये असा एकूण १७ कोटी ७१ लाख ६१ हजार ७३६ रुपयांचा (सुमारे १७.७१ कोटी) पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. हा पीकविमा शेतकऱ्यांना आज दिवसभरात वितरित केला असून उर्वरित शेतकऱ्यांनाही गतिमान पद्धतीने पीकविमा वितरीत होणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष दक्षता (Crop Insurance)

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीही खरीप हंगाम २०२५ मधील मूग पिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ८९ हजार ३९८ रुपयांचा विमा आज मंजूर झाला असून उर्वरित शेतकऱ्यांच्या विमा रकमेच्या वितरणालाही आजपासून सुरुवात झाली आहे. विमा कंपनी व प्रशासनाकडून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवली जात असून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कर्जत जामखेड मधील शेतकऱ्यांनी राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री ना. श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रा पवार, विधान परिषद सभापती ना. प्रा. राम शिंदे,कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.