Raid on Hookah Parlor : नगर : सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारस्कर मळा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर (Raid on Hookah Parlor) अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे (Deputy Superintendent of Police Dr. Dilip Tiparse) यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि तंबाखूजन्य पदार्थ (Tobacco Products) असा चार हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल
पोलीस अंमलदार हेमंत खंडागळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आदिराज विलास दोमल (रा. बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर), मोहम्मद सत्तार अन्सारी (रा. रांची, झारखंड, सध्या रा. दिल्लीगेट, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विविध कंपन्यांचे तंबाखूजन्य फ्लेवर्स हस्तगत (Raid on Hookah Parlor)
सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारस्कर मळा येथे आदिराज दोमल हा अवैधरित्या हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती डॉ. टिपरसे यांना मिळाली होती. त्यांनी अंमलदार खंडागळे, महेश मगर, सागर व्दारके यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने बुधवारी (ता.२२) या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. आदिराज दोमल हा या हुक्का पार्लरचा मालक असून, तो बेकायदेशीरपणे हे केंद्र चालवत होता. छाप्यात मोहम्मद अन्सारी हा तरूण हुक्का पिताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून विविध कंपन्यांचे तंबाखूजन्य फ्लेवर्स असा मुद्देमाल हस्तगत केला.



