
Donald Trump : हेल होल वक्तव्याच्या वादामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय (International) तणावानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अचानक सूर बदलत भारताबाबत (India) सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी भारताचे कौतुक करत, भारत हा एक महान देश आहे आणि त्याचे नेतृत्व एक अतिशय चांगला मित्र करत आहे, असे वक्तव्य केले.
नक्की वाचा : मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
भारताला महान देश संबोधले
नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्ते ख्रिस्तोफर एल्म्स यांनी देखील ट्रम्प यांच्या या विधानाची पुष्टी करत, भारताला महान देश संबोधलयाचे सांगितले. तसेच भारताच्या नेतृत्वासोबत ट्रम्प यांचे घनिष्ठ वैयक्तिक संबंध असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. येथे ट्रम्प यांचा अप्रत्यक्ष उल्लेख भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया (Donald Trump)
मात्र, या कौतुकाच्या विधानामागे एक दिवसापूर्वीचा वादग्रस्त प्रसंग आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन रेडिओ होस्ट मायकल सेव्हेज यांच्या पॉडकास्टमधील एक टिप्पणी रीपोस्ट केली होती. या टिप्पणीमध्ये भारत,चीन आणि इतर काही देशांना हेल होल म्हणजेच नरकाच्या खड्डा असा उलेख केला होता. या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
या प्रकरणावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सावध भूमिका घेत , आम्ही काही बातम्या पहिल्या आहेत, अशी मोजकी प्रतिक्रिया दिली होती. हेल होल वादाचा केंद्रबिंदू म्हणजे अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्व या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा. मायकल सेव्हेज यांनी आपल्या सेव्हेज नेशन पॉडकास्टमध्ये आशियायी देशांतील नागरिकांवर टीका करत, ते केवळ अमेरिकन नागरिकत्वासाठी येतात, असे वादग्रस्त विधान केले होते.
दरम्यान ट्रम्प यांनी आता भारताचे कौतुक करत आणि भरतोय नेतृत्वाशी मैत्रीचा उल्लेख करत, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, त्यांच्या आधीच्या विधानांमुळे निर्माण झालेला वाद पूर्णपणे शमणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


