Beating : कामाचे पैसे मागितल्याचा राग; मजुराला लाकडी दांडक्याने मारहाण

कामाचे पैसे मागितले असता पैसे देण्यास नकार

0
Beating : कामाचे पैसे मागितल्याचा राग; मजुराला लाकडी दांडक्याने मारहाण
Beating : कामाचे पैसे मागितल्याचा राग; मजुराला लाकडी दांडक्याने मारहाण

Beating : पाथर्डी : कामाचे पैसे मागितल्याच्या वादातून एका मजुरावर लाकडी दांडक्याने हल्ला करून मारहाण (Beating) करण्यात आल्याची घटना तिसगाव (Tisgaon) येथे घडली असून याप्रकरणी राधाकिसन बबन रासकर (वय ३६, रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांनी तिघांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) तक्रार दाखल केली आहे.

नक्की वाचा : सर्वसामान्यांची फसवणूक- मार्गदर्शन व उपाय’ हे पुस्तक सामान्यांसाठी पथदर्शक : अण्णा हजारे

कामाचे पैसे मागितले असता पैसे देण्यास नकार

रासकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  २२ एप्रिलला सायंकाळी सुमारे ५.३० वाजता त्यांनी सादिक रशिद शेख याच्याकडे कामाचे पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. दरम्यान, २३ एप्रिलला सकाळी सुमारे ७.३० वाजता सादिक शेख हा रासकर यांच्या घरी जाऊन कोणतेही कारण नसताना त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता वृद्धेश्वर हायस्कूल परिसरात मतदान करून बाहेर आलेल्या रासकर यांना तिसगाव वेशीसमोर पुन्हा गाठण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जीवे ठार मारण्याची दिली धमकी (Beating)

यावेळी सादिक शेख याने हातातील लाकडी दांडक्याने रासकर यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून त्यांना जखमी केले. तसेच अन्य दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे तिसगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत