Heat Wave : सूर्य कोपणार! विदर्भात उष्ण लहरींचा उद्रेक; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

0
Heat Wave : सूर्य कोपणार! विदर्भात उष्ण लहरींचा उद्रेक; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
Heat Wave : सूर्य कोपणार! विदर्भात उष्ण लहरींचा उद्रेक; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

नगर : राज्यात उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बहुतांश जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. विदर्भात उष्ण लहरींचा उद्रेक (Heat wave outbreak in Vidarbha)सुरूच असून विदर्भासाठी नागपूर वेध शाळेने परत एकदा उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट (Yellow Alert) जाहीर केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे चार दिवस अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या घरात राहणार असल्याचे नागपूर वेध शाळेने (IMD) सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारला घराबाहेर पडतांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

नक्की वाचा : ‘पनीर’च्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार; नवीन नियमावली काय?

उष्णतेची लाट लक्षात घेता सरकारकडून ॲक्शन प्लॅन (Heat Wave)

दुसरीकडे संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता सरकारकडून देखील ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. नागपूर आणि अमरावतीची बैठक घेतली. या दोन्ही बैठकींमध्ये जलसाठे जास्तीत जास्त मजबूत करणे, पाणी साठवून ठेवणे, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेणे, पाण्याची कपात करणे, अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि शहरातील जनतेला विनंती आहे की, पाणी यावर्षी जपून वापरायचे आहे, काटकसरीने पाणी वापरायचे आहे. प्रशासन तयार आहे. महाराष्ट्राची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली असून दुष्काळ परिस्थितीवर लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

अवश्य वाचा: आता PF काढण्यासाठी हे काम करा, अन्यथा मिळणार नाही PF चे पैसे

हवामान विभागाचा अंदाज उष्णतेबद्दल काय सांगतो? (Heat Wave)

सध्या विदर्भात उष्णतेची लाट सुरु आहे. काल (ता.२३) नागपूरचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हवामान विभाग हवेचे तापमान मोजून उष्णतेची गणना करते. मात्र नागरिकांना यापेक्षा जास्त तापमानाचे चटके बसतात. जेव्हा काल नागपूरचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस होते, तेव्हा नागपूरच्या सिमेंट रोड, डांबरी रोड, इमारतीच्या छताचे तापमान हे जवळपास ६० अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले. त्यामुळे विशेष करून शहरी व निम शहरी भागात नागरिकांना उष्णतेच्या लाटेचे अधिक चटके जाणवत असतात. हवामान विभागाने देखील ही बाब मान्य केली की, हवेच्या तापमानापेक्षा सरफेस एरियाचे तापमान ३० टक्क्यापर्यंत अधिक असते. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहे.