Scholarship Examination : पाथर्डीत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत; ३२ केंद्रांवर ३९९७ विद्यार्थ्यांचा सहभाग

Scholarship Examination : पाथर्डीत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत; ३२ केंद्रांवर ३९९७ विद्यार्थ्यांचा सहभाग

0
Scholarship Examination : पाथर्डीत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत; ३२ केंद्रांवर ३९९७ विद्यार्थ्यांचा सहभाग
Scholarship Examination : पाथर्डीत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत; ३२ केंद्रांवर ३९९७ विद्यार्थ्यांचा सहभाग

Scholarship Examination : पाथर्डी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (M.S.C.E.Pune) यांच्या वतीने इयत्ता चौथी व सातवीसाठी घेण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) पाथर्डी तालुक्यात अत्यंत सुरळीत व नियोजनबद्ध वातावरणात पार पडली.तालुक्यात एकूण ३२ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता चौथीसाठी १८ केंद्रे, तर इयत्ता सातवीसाठी १४ केंद्रांचा समावेश होता. या सर्व केंद्रांवर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नक्की वाचा : अहिल्यानगर मनपा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साहात समारोप

एकूण ३९९७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हजेरी

इयत्ता चौथीसाठी २७११ विद्यार्थी, तर इयत्ता सातवीसाठी १२८६ विद्यार्थी असे एकूण ३९९७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हजेरी लावली. प्रत्येक केंद्रावर आरोग्य विभागामार्फत पथके कार्यरत ठेवण्यात आली होती. आशा सेविका व आरोग्य सेवकांनी विद्यार्थ्यांची काळजी घेतली. तसेच सर्व केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा व वर्गांमध्ये फॅनची व्यवस्था करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासली नाही.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चोख नियोजनामुळे परीक्षा शांततेत (Scholarship Examination)

या सर्व चोख नियोजनामुळे परीक्षा शांततेत व कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरित्या पार पडली. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाची पायरी मानली जाते. या परीक्षेमुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, अभ्यासाची सवय व आत्मविश्वास वाढीस लागतो.

यशस्वी विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आधार मिळतो. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून भविष्यातील मोठ्या स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पाया तयार होतो.विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरत असून, शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढविण्यासाठी ही एक प्रभावी संधी मानली जाते.