fake dad: बेलापूरचा ‘तो’ भोंदू बाबा अखेर गजाआड; अत्याचाराच्या गुन्ह्याची दिली कबुली

श्रीरामपुरसह जिल्ह्यात एकच खळबळ

0


fake dad: श्रीरामपूर: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या बेलापूर परिसरातील गणेश माधवराव शिंदे नावाच्या भोंदू बाबाला (fake dad) आज (ता.२७) श्रीरामपूर पोलिसांनी अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश शिंदे या भोंदू बाबाने अत्याचार केल्याची कबुली दिली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तराज भवर यांनी दिली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू गणेश शिंदे याच्या विरोधात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अत्याचार तसेच जादूटोणा विरोधी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर महिलेची या भोंदू बाबाने सुमारे 20 लाखाची फसवणूकही केली आहे.

अवश्य वाचा-  ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

श्रीरामपुरसह जिल्ह्यात एकच खळबळ (fake dad)

नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात च्या गाजलेल्या महिला अत्याचारांच्या प्रकरणानंतर बेलापूर च्या या शिंदे नामक भोंदू बाबाच्या ‘लीला’ आता उजेडात आल्याने श्रीरामपूरसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील एका भोंदू बाबाला अटक झाल्यानंतर आता बेलापूरचा भोंदू बाबा पोलिसांच्या तावडीत सापडल्याने जोरदार चर्चा सुरू झाली. बेलापूरच्या ह्या बाबाचे भक्तांच्या फसवणुकीचे अनेक  प्रकार असून सर्व प्रकरणे पैसे देऊन तडजोडी करून  मिटवल्याची चर्चा आहे. बेलापूरच्या या भोंदू बाबाकडे अवैध मार्गाने मोठी संपत्ती जमा झाली असून भोंदूगिरीतूनच ती त्याने कमावल्याचा संशय आहे.आता पोलीस बेलापूरच्या ‘त्या’ भोंदू बाबाचे कोणते गैरप्रकार समोर आणतात हे चौकशी नंतर पुढे येईलच. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.