Monika Rajale : पाथर्डी : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खत उपलब्ध व्हावे, बोगस बियाणे व खतांचा पुरता बंदोबस्त व्हावा यासाठी तालुकास्तरीय कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Center) चालकांसोबत बैठक घेऊन कडक सूचना द्या. कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास दोषींवर तत्काळ कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी कृषी विभाग व तालुका प्रशासनाला (Department of Agriculture and Taluka Administration) दिल्या.
नक्की वाचा : ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ
आमदार राजळे म्हणाल्या की
तालुका कृषी विभागाच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व २०२६-२७ ची नियोजन आढावा बैठक सोमवारी (ता.२७) पाथर्डी पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी आमदार राजळे मार्गदर्शन करत होत्या. आमदार राजळे म्हणाल्या की, कृषी विभागाकडून होणारे बियाणांचे वाटप वेळेवर आणि योग्य दर्जाचे झाले पाहिजे. एखादा उपक्रम फक्त कागदावर राबवण्यापेक्षा तो प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवणे महत्त्वाचे आहे. खरीप हंगामपूर्व तयारी ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्या (Monika Rajale)
शेतकऱ्याने कुणावर अवलंबून राहू नये, यासाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. बियाणे, खताचा तुटवडा किंवा डुप्लिकेट बियाणे-खते याबाबत कृषी विभागाने पूर्ण काळजी घ्यावी. कोणावर कारवाई करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आगाऊ योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्या. वेळ निघून गेल्यावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे या संदर्भात कडक धोरण राबवा.पिक स्पर्धा – खरीप व रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट उत्पादन घेऊन स्पर्धकांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या शेतकऱ्यांचा आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मुग पिक (जिल्हास्तर) – गोवर्धन खेडकर, बबन सुपेकर (भालगाव), फक्कड शिदोरे (सोमठाणाखुर्द)
उडीद (तालुकास्तर) – प्रभाकर बाबर (कासार पिंपळगाव)
बाजरी (तालुकास्तर) – निखिल घोरपडे (शिराळ)
तुर (तालुकास्तर) – गोवर्धन खेडकर (भालगाव)
मुग (तालुकास्तर) – मीना गोवर्धन खेडकर (भालगाव)
रब्बी ज्वारी (तालुकास्तर) – शंकर शिदोरे (सोमठाणाखुर्द)
रब्बी गहू (तालुकास्तर) – राजेंद्र हाडके (सांगवी बुद्रुक)
रब्बी हरभरा (तालुकास्तर) – संदीप नेहूल (जवखेडे दुमला)
जवस (जिल्हास्तर) – चंद्रभान अंबू टेमकर (जोहारवाडी)
कृषी विभागामार्फत अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण
कृषी विभागामार्फत अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण यावेळी करण्यात आले. महादेव लोंढे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विशाल साबदे यांनी सूत्रसंचालन तर नंदकिशोर थोरे यांनी आभार मानले. या बैठकीस प्रांताधिकारी प्रसाद मते, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रेय डमाळे, तहसीलदार उद्धव नाईक, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, नंदकिशोर थोरे, वैभव थोरे, संकेत कराळे, फर्टीलायझर असोसिएशनचे सतीश मुनोत, राजेंद्र साप्ते, ललित खेडकर, अंकुश कासुळे, दत्तात्रय पठाडे आदी उपस्थित होते.



