Nilesh Lanke | निलेश लंकेंचं खरचं विधानसभा निवडणूक लढविणार का? राजकीय समीकरणे बदलणार का?

0

Nilesh Lanke | अहिल्यानगर जिल्ह्यात २०२४ची लोकसभा निवडणूक राज्यभर गाजली. भाजपच्या डॉ. सुजय विखे पाटलांना (Dr. Sujay Vikhe Patil) पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते निलेश लंके (Nilesh Lanke) खासदार झाले. मात्र, आता त्याच निलेश लंकेंनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे भाष्य केल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या. दोनच दिवसांत त्यांनी हे विधान म्हणजे गुगली होती, असे म्हणत घुमजाव केला. त्यांच्या या वक्तव्यावर सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

हेही वाचा – ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

दोघेही जिल्ह्यातील दिग्गज नेते (Nilesh Lanke)

१९९१-९२च्या लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्यात झाली. दोघेही जिल्ह्यातील दिग्गज नेते. बाळासाहेब विखे पाटलांना काँग्रेसचे तिकीट मिळू नये व त्यांचा पराभव व्हावा, यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या निवडणुकीत जातीने लक्ष द्यायला लावले होते, असे राजकीय विश्लेषक सांगतात. शरद पवारांनी काँग्रेसकडून तत्कालीन खासदार यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. बाळासाहेब विखे पाटलांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागूनही त्यांना ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे ठरवले. या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटलांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा घेत विखे पाटलांनी न्यायालयात दावा दाखल केला. हा खटला विखे पाटलांनी जिंकला. गडाखांचे पद गेले, सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी आली. शरद पवारांची राजकीय कारकीर्दही धोक्यात आली होती. या घटनेची सल शरद पवार यांना अजूनही असल्याचे, असे सांगितले जाते. 

नक्की वाचा : हवामान बदलावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिके घ्यावीत : खताळ

भाजपमध्ये नवे-जुने असे दोन गट (Nilesh Lanke)

२०१९मध्ये डॉ. सुजय विखे पाटलांनी आघाडीतील पक्षांना उमेदवारी मागितली होती. मात्र, नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नव्हती आणि विखे पाटलांना उमेदवारी द्यायलाही तयार होईना. अखेर डॉ. सुजय विखे पाटलांनी भाजपकडून उमेदवारी करत विजय मिळवला. विखे पाटलांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी निलेश लंकेंना बळ देण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते पारनेरचे आमदार होते. महाविकास आघाडीची यंत्रणा लंकेंच्या पाठीशी एकवटली. यातच भाजपमध्ये नवे-जुने असे दोन गट दिसून येऊन लागले. नाराज जुन्या नेत्यांनी सुजय विखे पाटलांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी लंकेंना मदत केल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.   

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लंके खासदार होऊन आता दोन वर्षे झाली आहेत. या कालावधीत विधानसभा निवडणुकीत राणी लंके यांचा पराभव झाला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही वेगात बदलली आहेत. यातच दोन दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना निलेश लंके म्हणाले की, कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढविली, मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे, असे त्यांनी सांगितले होते. या संदर्भात पत्रकारांनी सुजय विखे पाटलांना विचारताच त्यांनी आमच्या सर्व महायुतीच्या लोकांची इच्छा आहे की, त्यांनी लोकसभा लढवावी. त्यांनी जर लढवायची नाही, असं ठरवलं असेल तर तो सर्व मतदारांचा मोठा अपमान आहे, अशी खोचक टीका सुजय विखे पाटलांनी केली होती. दोन दिवसांत निलेश लंके यांनी सांगितले की, “मी एक गुगली टाकली आणि लगेच रिप्लाय आला. राजकारणात अशीच खेळी समजून घेतली पाहिजे. त्यामुळेच मी आमदार आणि खासदार होऊ शकलो,” या बदलत्या विधानांमुळे राजकीय चर्चांना जिल्ह्यात उधाण आले आहे. निलेश लंके अशी वक्तव्ये करून नवीन राजकीय समीकरण मांडण्याचा प्रयत्न करत आहेत का? की जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांशी जुळवून घेत आहेत? या विषयांवर राजकीय चर्चा सुरू आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here