Watermelon : नगर : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे कलिंगड सध्या जीवघेणे ठरू लागले आहे. मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने मुंबई येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फळांमधील रसायनांच्या वापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विक्रेते कलिंगड अधिक लाल दिसावे यासाठी त्यात घातक रसायने आणि इंजक्शन्स टोचतात. अशा रसायनांमुळे शरीराला फायदा होण्याऐवजी गंभीर आजार किंवा मृत्यूचा धोका उद्भवू शकतो.
हेही वाचा : आठवा वेतन आयोग लागू होणार? तीन दिवसीय बैठकीचे आयोजन
टिशू पेपर चाचणी
दुकानदार जेव्हा कलिंगड कापून दाखवतो, तेव्हा त्याच्या लाल भागावर एक पांढरा टिशू पेपर ठेवा. जर त्या कागदाला लाल किंवा डार्क ऑरेंज रंग लागला, तर समजा त्यात कृत्रिम रंग वापरला आहे. नैसर्गिक कलिंगडामुळे कागदाचा रंग बदलत नाही.
पाण्याची चाचणी (Watermelon)
कलिंगडाचा एक छोटा तुकडा किंवा फोड एका पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये टाका. जर पाण्याला काही मिनिटांतच लाल रंग आला, तर ते कलिंगड रासायनिक रंगाने भरलेले आहे. खऱ्या कलिंगडामुळे पाण्याचा रंग स्वच्छ राहतो.
नैसर्गिक खुणा तपासा (Watermelon)
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या कलिंगडाचा देठ वाळलेला आणि पिवळसर असतो. कलिंगडाच्या बुडाशी मोठा पिवळा ठिपका असतो, जो ते जमिनीवर नैसर्गिकरीत्या पिकल्याचे लक्षण आहे. कृत्रिमरित्या पिकवलेलं कलिंगडाचा देठ एकदम हिरवा असतो.
नक्की पहा : वाहतूक सुरळीत करण्यासाठी खासदार निलेश लंके रस्त्यावर
कलिंगड लवकर पिकवण्यासाठी आणि त्याचा गोडवा वाढवण्यासाठी अनेकदा ‘इरिथ्रोसिन’ सारख्या रंगांचा आणि साखरेच्या पाकाचा वापर होतो. ही रसायने पोटात गेल्यावर फूड पॉयझनिंग होऊन अवयवांचे कार्य निकामी होऊ शकते. त्यामुळे केवळ बाहेरून चमकणारे फळ न घेता, वरील चाचण्या करूनच आरोग्यदायी फळांची निवड करा.



