Parner Crime: “बुवा तेथे बाया” अशी जुनी महान आहे. म्हणजेच जिथे भोंदू बाबा असतात किंवा ढोंगीपणा असतो, तिथे भाबडी लोकं फसवणुकीसाठी गर्दी करतातच. असे प्रकार आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर सर्रास घडताना पाहायला मिळत आहे. अशीच घटना पारनेर (Parner Crime) तालुक्यातील निघोजमध्ये (Nighoj)घडलीय.अंधश्रद्धा आणि झटपट श्रीमंतीच्या आमिषाला बळी पडून निघोजमधील पाच जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक (Five People Defrauded of ₹1 Crore) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नक्की वाचा: पुण्यातील प्रसिद्ध सराफाची १८ कोटीची फसवणूक; केडगावच्या ‘त्या’ महिलेसह तीन आरोपींना अटक
नेमकं घडलं काय? (Parner Crime)
शिरूर मध्ये वास्तव्याला असल्याचे सांगणाऱ्या एका भोंदूबाबाने पैशांची पूजा केल्यास १० पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून निघोजच्या ५ जणांना जाळ्यात ओढले. मिळालेल्या माहितीनुसार, निघोजमधील एका व्यक्तीशी ओळख वाढवत या भोंदूबाबाने आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला. बनावट भक्तांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून त्याने संबंधित व्यक्तीला तसेच इतर चार जणांना पैशांच्या पावसाचे स्वप्न दाखवले. त्यानंतर पाचही जणांनी जमीन गहाण ठेवणे, दागिने तारण ठेवणे तसेच सावकारांकडून कर्ज घेऊन एकूण १ कोटी रुपयांची रक्कम उभी केली.
अवश्य वाचा: अरणगाव हादरलं! मुलानेच केली बापाची हत्या; नेमकं प्रकरण काय?
पूजेच्या दिवशी काय झालं? (Parner Crime)
ठरलेल्या दिवशी रात्रीच्या वेळी पूजा आयोजित करण्यात आली. या पूजे दरम्यान भोंदूबाबाने सर्वांना मौन पाळण्यास सांगून तीर्थ दिले. हे तीर्थ घेतल्यानंतर काही वेळातच सर्वजण बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुद्धीवर आल्यानंतर भोंदूबाबा आणि पैशांची रक्कम दोन्ही गायब झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यांनतर या पाच जणांनी शिरूर तसेच गुजरातपर्यंत भोंदूबाबाचा शोध घेतला; मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
या घटनेबाबत गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू असली तरी अजून पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंधश्रद्धा व भोंदुगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सजग राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



