Sunetra Pawar : नगर : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने शासकीय ध्वजवंदन केले. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.
हेही वाचा : शेतकरी व कष्टकरी मुलाची गरुडझेप; सचिन वाघचौरे यांची PSI पदी निवड
प्रथमच बीड दौऱ्यावर
अजित पवार हयात असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते आणि महाराष्ट्र दिनाचे ध्वजवंदन नेहमी त्यांच्याच हस्ते होत असे. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या प्रथमच बीड दौऱ्यावर आल्या होत्या. प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन केल्यानंतर जेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा अजित पवार यांचा उल्लेख करताना त्यांचा कंठ दाटून आला. या भावूक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
नक्की वाचा : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात
डोळ्यातून अश्रू (Sunetra Pawar)
पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी सर्वप्रथम राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. यानंतर बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.



