Radhakrushn Vikhe : ‘ग्रीन सिटी’सारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक : राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrushn Vikhe : 'ग्रीन सिटी'सारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrushn Vikhe : 'ग्रीन सिटी'सारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrushn Vikhe : नगर : शहरे झपाट्याने विस्तारत असताना वाढते प्रदूषण नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करत आहे. बदलत्या जीवनशैलीची मोठी किंमत समाजाला मोजावी लागत असून, वैद्यकीय सर्वेक्षणांतूनही प्रदूषणामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘ग्रीन सिटी’सारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा : बीडमध्ये ध्वजवंदननंतर सुनेत्रा पवार भावूक; अजितदादांच्या आठवणीने पाणावले डोळे 

एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प

साईद्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त आयोजनाने ‘ग्रीन सिटी’ मोहिमेअंतर्गत एका वर्षात एक लाख वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते शहरातील माऊली सभागृह येथे झाला. यावेळी महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

क्की पहा : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, वाढती वाहतूक, वाहनांची वाढती संख्या, वेगाने उभ्या राहत असलेल्या वसाहती आणि पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहरातील प्रदूषणात लक्षणीय वाढ होत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ‘ग्रीन सिटी’ हा उपक्रम या पार्श्वभूमीवर अत्यंत उपयुक्त ठरणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासात हरित क्षेत्राचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे.

प्रमाणपत्र देऊन सन्मान (Radhakrushn Vikhe)

उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये ‘ग्रीन सिटी’ मोहिमेबाबत माहिती दिली. मोहिमेत सहभागी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.