WAPL | महिलांच्या अहिल्यानगर प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत ‘शिवराज वॉरिअर्स’ संघ अजिंक्य

0

WAPL | नगर : अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी मैदानावर २४ ते ३० एप्रिल या कालावधीत अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने एसके क्रिकेट अॅकॅडमी आयोजित WAPL अहिल्यानगर प्रिमियर लिग (Women’s Ahilyanagar Premier League) ही महिलांची क्रिकेट स्पर्धा झाली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात शिवराज वॉरिअर्स संघाने GNF नाईट रायडर्स संघाला पराभूत करत चषक पटकावला.

हे वाचा – ‘ग्रीन सिटी’सारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक : राधाकृष्ण विखे पाटील

पारितोषिक वितरण (WAPL)

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी वाकोडी येथील मैदानावर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी डॉ. हर्षवर्धन तन्वर, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, केशव नागरगोजे, अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेश गोंडाळ, केशव नागरगोजे, उद्योजक अभिषेक वाकळे, नगरसेवक जितेंद्र गंभीर, संदीप आरोटे, अंपायर्स अॅण्ड स्कोरर्स असोसिएशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय कविटकर आदी उपस्थित होते.

नक्की पहा : पिंपरी निर्मळ परिसरात गर्भलिंग तपासणी; डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात

आयपीएलमधील खेळाडूंचा सहभाग (WAPL)

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, खेळात विजय पराजय होत असतो. मात्र, खेळातून जीवन संघर्षातील बारकावे कळतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी लवकर जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या सुधारणा केल्या जाणार आहेत. त्यातून अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी तयार होतील. त्यातून अहिल्यानगरचे नाव क्रीडा क्षेत्रात जगाच्या नकाशावर झळकेल. WAPL स्पर्धेत महिलांची IPL स्पर्धा गाजवलेल्या खेळाडू पुनम खेमनार, किरण नवगिरे, मुक्ता नगरे, आरती केदार, अंबिका वाटाडे, इशा घुले, सायली लोणकर आदी सहभागी झाल्या. त्यांच्या खेळामुळे स्पर्धेतील इतर खेळाडूंनाही क्रिकेट खेळातील बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या असतील. त्या अनुभवाचा उपयोग पुढील स्पर्धांत खेळाडूंना होईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here