AMC : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त पवित्र बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महापौर सौ. ज्योती अमोल गाडे, आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांचीही उपस्थिती लाभली.
नक्की वाचा : शेतकरी व कष्टकरी मुलाची गरुडझेप; सचिन वाघचौरे यांची PSI पदी निवड
उत्स्फूर्त सहभाग
या कार्यक्रमाला आंबेडकरी समाजातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हेही पहा : वीजप्रश्नी आमदार रोहित पवार आक्रमक; महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले
भगवान बुद्धांचे स्मरण (AMC)
भगवान बुद्धांच्या करुणा, समता आणि शांततेच्या विचारांचे स्मरण करून समाजात बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.



