Gas Cylinder :  व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १ हजारांनी महागला;  आजपासून नवे दर लागू 

0
Gas Cylinder :  व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १ हजारांनी महागला;  आजपासून नवे दर लागू 
Gas Cylinder :  व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १ हजारांनी महागला;  आजपासून नवे दर लागू 

Gas Cylinder : नगर : आजपासून (ता. १) सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये ९९३ रुपयांची वाढ केली आहे. परिणामी, दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये, व्यावसायिक एलपीजीच्या किंमती आता ३ हजार रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेल्या आहेत. तथापि, या वेळी घरगुती गॅस सिलिंडर्सच्या किमतींमध्ये मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : ‘डिफेन्स क्लस्टर’च्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा वेगवान विकास : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

व्यावसायिकांना मोठा फटका

बंगालसह 5 राज्यांमधील निवडणुकीचे निकाल सोमवार, 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. पण त्याआधी, महागाईने सर्वसामान्य लोकांना, विशेषतः व्यावसायिकांना आणखी एक फटका दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांच्या खर्चावर होत आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांपर्यंत महाग झाला आहे.

नक्की पहा : वीजप्रश्नी आमदार रोहित पवार आक्रमक; महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले

हॉटेलचे दार महागणार? (Gas Cylinder)

सरकारी तेल कंपन्या म्हणजे OMCs च्या आकडेवारीनुसार वेगवेगळ्या शहरांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वेगवेगळी वाढ केली गेली आहे. म्हणजे राजधानी दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1000 रुपयांनी वाढला आहे. अशाप्रकारे, देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दरांमध्ये लक्षणीय तफावत पाहायला मिळत आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे लग्नसराईच्या काळात जनतेला मोठा फटका बसेल आणि आता हॉटेल्स व रेस्टॉरंटमधील जेवणासाठी आणखी खिसा रिकामा करावा लागेल.