Result : नगर : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून उद्या बारावीचा जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन गुणपत्रिका पाहाता येणार आहे. राज्यातील बारावी परिक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हेही वाचा : ‘डिफेन्स क्लस्टर’च्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा वेगवान विकास : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
पत्रकार परिषदेचे आयोजन
सदर निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक व इतर आवश्यक तपशीलांच्या आधारे निकाल पाहता येईल. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शनिवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
नक्की पहा : अटल पेन्शन योजना आहे तरी काय?
असा पहा निकाल (Result)
पत्रकार परिषदेमध्ये राज्याचा निकाल, कोणत्या विभागात किती निकाल आणि एकूण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निकाल जाहीर होईल. त्यानंतर, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.



