Kopargaon Bus Depot : कोपरगाव बस डेपोच्या काँक्रिटीकरणाचे आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन

नाव न घेता माजी आमदारांवर साधला निशाणा

0
Kopargaon Bus Depot : कोपरगाव बस डेपोच्या काँक्रिटीकरणाचे आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन
Kopargaon Bus Depot : कोपरगाव बस डेपोच्या काँक्रिटीकरणाचे आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन

Kopargaon Bus Depot : कोपरगाव : बस डेपोच्या (Kopargaon Bus Depot) विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज (ता. १) महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Din) निमित्ताने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी उपलब्ध करून दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून बस डेपो परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

नक्की वाचा : शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार : ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील

कामाला अधिकृत सुरुवात

कोपरगाव बस डेपो येथे आयोजित कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांनी भूमिपूजन करून कामास अधिकृत सुरुवात केली. या प्रकल्पामुळे बस डेपो परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहे. पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे आणि वाहतुकीतील अडथळे यांसारख्या समस्यांवर या कामामुळे कायमस्वरूपी उपाय होणार आहे. उपस्थितांनी आमदार आशुतोष काळे यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक करत या कामामुळे बस डेपोचे रूपांतर आधुनिक सुविधायुक्त केंद्रात होईल, असा विश्वास व्यक्त केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नाव न घेता माजी आमदारांवर साधला निशाणा (Kopargaon Bus Depot)

यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी बसस्थानकाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत माजी आमदारांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. डॉक्टरला नस ओळखता आली तर उपचार व्यवस्थित करता येते आणि लोकप्रतिनिधींना लोकांची गरज कळाली तर काम व्यवस्थित होतं असे म्हणत आमदार काळेंनी माजी आमदारांवर टीका केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.