Suicide Case : त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे सचिव मनिष घाडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; संस्था कार्यालयात केला होता आत्महत्येचा प्रयत्न 

0

Suicide Case : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे पाटील यांचे शुक्रवारी (१ मे २०२६) पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. २८ एप्रिल रोजी त्यांनी संस्थेच्या कार्यालयात स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ज्यात ते गंभीर भाजले होते.  त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

हेही वाचा :  हरियाणातील ‘रोड मराठा’ बांधव महाराष्ट्र दौऱ्यावर; श्रीगोंद्यातील पानिपतवीरांच्या स्मारकांना देणार भेटी 

तालुक्‍यात हळहळ व्यक्‍त

स्वतःला पेटवून घेतल्याने ते गंभीररित्या जखमी झालेले होते. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची काल (ता. ०१) प्राणज्योत मालवली. त्यांचा स्वभाव हा अत्यंत हसतमुख आणि शांत असल्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच तालुक्‍यात मोठी हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

नक्की पहा : ब्रेक फेल झाल्याने कार पलटी; अरणगाव परिसरातील घटना

आत्महत्येचे कारण अस्पष्ट (Suicide Case)

त्रिमूर्ती शौक्षणिक संकुलात त्यांच्या निधनाचे वृत्त येताच संस्थेच्या अधिकारी कर्मचारी आणि शिक्षिकेत्तर कर्मचारी सुन्न झाले असून सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्येचा प्रयत्न कशामुळे केला याचे निश्चित कारण समजले नाही.