Police Pride : अहिल्यानगरच्या खाकीचा गौरव; पोलीस हवालदार राजू सुद्रिक यांचा पोलीस ‘महासंचालक सन्मानचिन्हा’ने सन्मान

0
Police Pride : अहिल्यानगरच्या खाकीचा गौरव; पोलीस हवालदार राजू सुद्रिक यांचा पोलीस 'महासंचालक सन्मानचिन्हा'ने सन्मान
Police Pride : अहिल्यानगरच्या खाकीचा गौरव; पोलीस हवालदार राजू सुद्रिक यांचा पोलीस 'महासंचालक सन्मानचिन्हा'ने सन्मान

Police Pride : नगर : राज्यातील पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia) पुरस्कार अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदार राजू आप्पासाहेब सुद्रिक यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : उद्या बारावीचा निकाल; दुपारी पाहता येणार ऑनलाईन गुणपत्रिका

१५ वर्षांपासून कार्यरत

महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सन २०२५ या वर्षासाठीचे सन्मान नुकतेच घोषित करण्यात आले. यामध्ये राज्यभरातील ८०० पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. सुद्रिक यांनी अहिल्यानगर पोलीस दलात गेल्या १५ वर्षांपासून कर्तव्य बजावत आहे. त्यांचा उल्लेखनीय सेवा अभिलेख, प्रशासकीय कार्यक्षमता आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

नक्की पहा : बायोफ्युएल प्रकल्पाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

पोलीस अधीक्षकांकडून कौतुक (Police Pride)

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्राद्वारे सुद्रिक यांचे कौतुक करताना म्हटले की, “आपल्या या उत्तम कामगिरीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यात आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी पार पाडाल, अशी मला आशा आहे. सुद्रिक हे सध्या एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल पोलीस दलातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.