Maharashtra Din : कोपरगाव येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन

आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
Maharashtra Din : कोपरगाव येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन
Maharashtra Din : कोपरगाव येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन

Maharashtra Din : कोपरगाव : शहरात महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त (Maharashtra Din) तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या (International Workers’ Day) पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध ठिकाणी ध्वजारोहण झाले आहे. तहसील कार्यालय कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेला मुख्य शासकीय ध्वजारोहण (Flag Hoisting) समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

नक्की वाचा : कोपरगाव बस डेपोच्या काँक्रिटीकरणाचे आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन

आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सकाळी ८.०० वाजता झालेल्या या समारंभात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपालिका येथे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते, तर कोपरगाव शहर तसेच तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तहसील येथील मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात येऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते (Maharashtra Din)

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या प्रगतीचा गौरव करण्यात आला, तर कामगार दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, प्रभारी तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मुख्याधिकारी सुहास जगताप, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आदींसह आजी-माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध शाळांचे विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.