नगर : लाइफ जॅकेट घातलेली एक आई (A mother wearing a life jacket) आणि तिचा निष्पाप मुलगा छातीशी कवटाळलेला,जेव्हा दोघांचे मृतदेह बर्गी धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा या हृदयद्रावक दृश्याने सर्वांना हादरवून सोडले. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये बरगी धरणाजवळ (Jabalpur Cruise Accident) नर्मदा नदीत एक क्रूझ बोट बुडून (Accident Cruise Boat Sinks) ही मोठी दुर्घटना घडली. ३० एप्रिलला ही घटना घडली. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र लाईफ जॅकेट घालूनही आई आणि मुलाचा मृत्यू झाला कसा असाही प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. याबद्दल तज्ज्ञाचे मत काय आहे ते जाणून घेऊ…
नक्की वाचा: मोठी बातमी! नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन
नेमकं काय घडलं? (Jabalpur Cruise Accident)
गुरुवारी संध्याकाळी ३० पर्यटकांना घेऊन ज्यावेळी क्रूझ बोट बर्गी डॅम मध्ये फेरफटका मारत होती. त्यावेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि क्रूझचे संतुलन बिघडून ती पाण्यात उलटली. आणि अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. आता जबलपूरमध्ये ज्यावेळी क्रूझ शिपचा अपघात झाला, त्यावेळी बोटीवरील लोकांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते. जेव्हा बोट बुडू लागली, तेव्हा घाईघाईने लाईफ जॅकेटचे वाटप सुरू झाले. याच दरम्यान, त्या महिलेने आपल्या मुलाला स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये घट्ट बांधले. इथेच सर्वात मोठी चूक झाल्याचं बोललं जात आहे.
अवश्य वाचा: निघोजकरांना पैशाच्या पावसाचे आमिष; भोंदूबाबाने १ कोटीची केली फसवणूक
लाईफ जॅकेटचा वापर कसा करावा? (Jabalpur Cruise Accident)

तज्ञांच्या मते, लाईफ जॅकेट व्यक्तीला पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी बनवलेले असते. ते योग्य वेळी आणि व्यवस्थित घातल्यास तुमचा जीव वाचवू शकते. पण त्या महिलेने आपल्या मुलालाही स्वतःच्या लाईफ जॅकेटमध्ये ठेवले होते, यामुळे संतुलन बिघडले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.एक लाईफ जॅकेट हे एकाच व्यक्तीसाठी असते .त्यातून एकाच व्यक्तीला पाण्यावर तरंगते ठेवण्यासाठी बनवलेले एक विशेष प्रकारचे तरंगणारे फोम आहे. ते घालताना खूप खबरदारी घेणे आवश्यक असते, अन्यथा ते ऐनवेळी निकामी होऊ शकते आणि घालणाऱ्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू शकतो. जबलपूर क्रूझ शिप अपघातात नेमके हेच घडले.

तज्ञांच्या मते,आईने आपल्या मुलाला स्वतःच्याच लाईफ जॅकेटमध्ये ठेवले होते. लाईफ जॅकेट घालणाऱ्या व्यक्तीचे डोके पाण्यावर आणि शरीर पाण्यावर तरंगते ठेवण्यासाठी बनवलेले असते. मात्र, जबलपूर अपघातात आईने ते योग्यरित्या घातले नव्हते. लाईफ जॅकेट एका व्यक्तीला पाण्यावर तरंगते ठेवण्यासाठी बनवलेले असते, परंतु जेव्हा एकाच वेळी दोन व्यक्ती त्यात असतात, तेव्हा ते योग्यरित्या काम करत नाही, यामुळे घालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आणि याच कारणाने या व्हायरल फोटोमधील आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितले जात आहे.
आता येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, धरण परिसरात अचानक आलेले वादळ, क्रूझ बोटीच्या वरच्या डेकवर आणि खाली पर्यटक ये-जा करत असल्यामुळे गुरत्वाकर्षण केंद्रात झालेला बदल यांसारख्या घटनांच्या एकत्रित परिणामामुळे ही घटना घडली असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. तर याच २ रे कारण जे समोर आले आहे. ते म्हणजे सुरक्षेत हलगर्जीपणा – हवामान विभागाचा इशारा असतानाही क्रूझ चालकाने ही बोट पाण्यात नेली, तसेच क्रुझवरील प्रवाशांना लवकर लाईफ जॅकेट देण्यात आली नाही. तसेच आलेल्या वादळामुळे बोटीचे संतुलन बिघडून ती उलटली अशी अनेक कारणे सांगितली जात आहेत. आता प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून मृताच्या कुटुंबियांना मदतीचा हात देखील देण्यात आलाय. मात्र या दुर्घटनेवर सरकार पुढे काय भूमिका घेणार ते पहावे लागणार आहे.



