Dharmakirti Maharaj Parbhanikar : ‘वारकरी संत आणि सुफी संतांच्या विचारातच मानवतेचे कल्याण’ : धर्मकिर्ती महाराज परभणीकर

महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम संस्कृती शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आली

0
Dharmakirti Maharaj Parbhanikar : 'वारकरी संत आणि सुफी संतांच्या विचारातच मानवतेचे कल्याण' : धर्मकिर्ती महाराज परभणीकर
Dharmakirti Maharaj Parbhanikar : 'वारकरी संत आणि सुफी संतांच्या विचारातच मानवतेचे कल्याण' : धर्मकिर्ती महाराज परभणीकर

Dharmakirti Maharaj Parbhanikar : पारनेर : “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे वारकरी संप्रदायातील (c) संतांनी आणि मुस्लिम सुफी संतांनी आपल्या कार्यातून केवळ भक्तीचाच नव्हे, तर समता, बंधुता आणि मानुसकीचा (Humanity) मार्ग दाखवला आहे. आजच्या काळात सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही परंपरांच्या विचारांची मोठी गरज आहे,” असे परखड मत प्रसिद्ध प्रबोधनकार धर्मकिर्ती महाराज परभणीकर (Dharmakirti Maharaj Parbhanikar) यांनी व्यक्त केले. ते जमाअत ए इस्लामी हिंद पारनेर कब्रस्तान मज्जिद येथे आयोजित वैचारिक जागर प्रबोधन प्रसंगी आयोजित विशेष प्रवचन सोहळ्यात ‘वारकरी संत आणि सुफी परंपरा एक सामाजिक अनुबंध’ या विषयावर ते बोलत होते.

नक्की वाचा : दीक्षार्थी मधुरा भंडारी यांचे स्वागत; पाथर्डीत उत्साहाचे वातावरण

संतांनी कधीही माणसांत भेदभाव केला नाही

धर्मकिर्ती महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत वारकरी आणि सुफी संतांच्या शिकवणीतील साम्य अधोरेखित केले. ते म्हणाले की, जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडतात. तसाच विचार सुफी संतांनी ‘मोहब्बत’ आणि ‘खिदमत-ए-खल्क’ (मानवतेची सेवा) या माध्यमातून दिला आहे.”वारीतील भगवा झेंडा आणि सुफी दर्ग्यांवरील संदेश हे दोन्हीही द्वेष मिटवून प्रेमाची पेरणी करण्याचे काम करतात. संतांनी कधीही माणसांत भेदभाव केला नाही, मग आपण का करावा?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

द्वेषाला बळी न पडण्याचे आवाहन (Dharmakirti Maharaj Parbhanikar)

महाराजांनी आपल्या भाषणात संत नामदेव महाराज आणि सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. ‘शेख महंमद अविंध, त्याचे हृदयी गोविंद’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम संस्कृती शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आली आहे. हीच संस्कृती खऱ्या अर्थाने भारताची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.सध्याच्या काळात सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून समाजात पसरवल्या जाणाऱ्या द्वेषाला बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

प्रबोधनपर सोहळ्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण

“जर आपण ज्ञानेश्वरी आणि सुफींचे तत्वज्ञान नीट समजून घेतले, तर समाजात कधीही तेढ निर्माण होणार नाही. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, हाच खरा धर्म आहे,” असेही ते म्हणाले.या कार्यक्रमाच्या शेवटी महाराजांनी उपस्थित जनसमुदायाला सामाजिक सलोखा राखण्याची शपथ दिली. या प्रबोधनपर सोहळ्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, महाराजांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.