नगर: पुणे (Pune Crime News) जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर (Nasarapur) परिसरात साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून (Sexual Assault on a Three-and-a-Half-Year-Old Girl) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी (दि.१) रात्री आंदोलन केले. त्यानंतर आज शनिवारी ग्रामस्थांनी मोर्चा काढून बंद पुकारला आहे.
नक्की वाचा: जबलपूर दुर्घटनेत लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडाले कसे?
नेमकं काय घडलं? (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला तिच्या आजीकडे सुट्टी निमित्त रहायला आली होती. दुपारच्या सुमारास नसरापूर येथील राम मंदिर परिसरात खेळत असताना एका ६५ वर्षीय व्यक्तीने तिला आमिष दाखवून तिथून जवळच असलेल्या एक गुरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर निर्दयीपणे अत्याचार केला. त्यानंतर नराधमाने तिचा खून केला. दरम्यान, मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेतला. परंतु ती सापडून आली नाही. दरम्यान परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तपास केला असता ही व्यक्ती एका आडबाजूला जात असल्याचे दिसले.
यावरून त्या भागात कुटुंबियांनी शोध घेतला असता तिचा एका गोठ्यामध्ये झाकलेले अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. नागरिकांनी ज्या व्यक्ती बरोबर ती गेली होती. त्या व्यक्तीचा शोध गावच्या परिसरात घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो गावच्या नदीकडील भागात सापडला. दरम्यान, त्याला पकडून आणून मुलगी कुठे आहे? तु काय केलस? असे विचारले असता त्याने मी काही केले नाही असे उत्तर दिले. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार समोर आला.
अवश्य वाचा: जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!
आरोपी पोलिसांच्या ताब्यात (Pune Crime News)
आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. या भागातील नागरिकांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. घा घटनेनंतर आमदार शंकर मांडेकर यांनी नसरापूरला भेट दिली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. तसेच फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे. या आरोपीविरोधात खून, बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



