Karjat Police Station : कर्जत : बदलत्या काळानुसार पोलीस खात्यात (Police Department) ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. अत्याधुनिक तपास यंत्रणेसह अत्याधुनिक वाहने पोलीस खात्यात दाखल झालेली असून आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या वाहनांची मोठ्या प्रमाणावर मदत होईल असे प्रतिपादन पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे (Pravin Lokhande) यांनी केले. ते एक मे महाराष्ट्र दिन कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) दंगल नियंत्रक अत्याधुनिक पोलीस वाहन पूजन प्रसंगी बोलत होते.
नक्की वाचा : ‘वारकरी संत आणि सुफी संतांच्या विचारातच मानवतेचे कल्याण’ : धर्मकिर्ती महाराज परभणीकर
मोठे प्रकाशझोत असणारी यंत्रणा उपलब्ध
अहिल्यानगर पोलीस विभागाच्यावतीने दंगल नियंत्रण व कायदा व सुव्यवस्था राखणे कामी या अत्याधुनिक वाहनाची मोठी मदत होईल. या वाहनावर चारी बाजूने संरक्षक जाळी सह मोठे प्रकाशझोत असणारी यंत्रणा उपलब्ध असून लांब पल्ल्याची अत्याधुनिक कॅमेरे, वाहनावर स्वयंचलित मनोरा, या मनोऱ्यावरून पोलीस कोणत्याही प्रकारच्या गर्दीवर सहज नियंत्रण मिळू शकतील अशी तजवीज करण्यात आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदत (Karjat Police Station)
यासह वाहनाच्या आत पोलीस अंमलदारांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे शस्त्र ठेवण्यासाठी जागा, दंगल नियंत्रणासाठी लागणारे साहित्य आदी बाबींचा समावेश असून भविष्यात या वाहनाद्वारे कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिसांना मदत होईल असे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी म्हटले. याप्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, बाळासाहेब मुळीक, गुप्त वार्ता विभागाचे पोलीस अंमलदार दीपक कोल्हे, यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार होमगार्ड उपस्थित होते.



