A terrible fire: कोळगाव येथे भीषण आग; लाखोंचे नुकसान

स्थानिक पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न

0

A terrible fire: श्रीगोंदा: तालुक्यातील कोळगाव येथे धनश्री बायोफ्यूल प्रकल्पामध्ये भीषण आग (A terrible fire) लागल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली.  या आगीत बायोफ्यूल उत्पादनासाठी साठवून ठेवलेले रॉ मटेरियल (कच्चा माल) पूर्णपणे जळून खाक होऊन गणेश साके यांचे सुमारे १० ते १५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोळगाव येथील गट नंबर ७७२ मध्ये गणेश साके यांचा बायोफ्यूल प्रकल्प आहे. याठिकाणी लाकडी भुसा याचा मोठा कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. या साठ्याला अचानक आग लागली. कच्चा माल वाळलेला असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले.

अवश्य वाचा- कर्जत पोलीस उपविभागात अत्याधुनिक तपास यंत्रणेसह अत्याधुनिक वाहन दाखल

स्थानिक पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न (A terrible fire)

आगीची तीव्रता इतकी भीषण होती की तब्बल पाच तास ही आग धगधगत होती. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात लांबून दिसत होते. स्थानिक पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते. श्रीगोंदा नगरपालिकेचा अग्निशामक दलाचा बंब बोलावून घेत बंबाच्या सहाय्याने आगीवर पाणी मारत अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग आटोक्यात येईपर्यंत प्रकल्पातील मशिनरी आणि कच्चा माल असे अंदाजे १५ ते २० लाखांचे साहित्य जळून खाक झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.