Kalsubai-Harishchandragad Sanctuary : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना

Kalsubai-Harishchandragad Sanctuary : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना

0
Kalsubai-Harishchandragad Sanctuary : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना
Kalsubai-Harishchandragad Sanctuary : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना

Kalsubai-Harishchandragad Sanctuary : अकोले : बुद्ध पौर्णिमेच्या (Buddha Purnima) चांदण्या रात्रीचे औचित्य साधत कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात (Kalsubai-Harishchandragad Sanctuary) झालेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत (Wildlife Census) बिबट्यांसह एकूण ३१७ वन्यप्राणी आढळले.

नक्की वाचा : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

पाणथळ जागी मचान उभारुण वन्यप्राण्यांची गणना

नाशिक वन्यजीव विभागाच्या भंडारदरा व राजूर अशा दोन्ही अभयारण्यात उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या सूचनेनुसार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित व प्रतिभा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हौशी वन्यप्रेमी व वन कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १ मे) रात्री वन्यप्राण्यांची गणना केली. यासाठी पाणथळ जागी मचान उभारण्यात आले होते. तसेच अभयारण्यात उभारण्यात आलेल्या मनोऱ्यांचाही वापर करण्यात आला. यासाठी ३२ ठिकाणांच्या वन्यप्राण्यांच्या हालचालींचे निरीक्षण करत नोंदी घेण्यात आल्या. काही ठिकाणी कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गावित यांनी सांगितले. भंडारदरा वनपरिक्षेत्रात एकूण ६४, तर वनपरिक्षेत्रात राजूर सर्वाधिक २५३, असे एकूण ३१७ वन्यप्राणी आढळून आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गावित व सोनवणे यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आढळले इतके प्राणी (Kalsubai-Harishchandragad Sanctuary)

बुद्ध पौर्णिमेची सायंकाळ ते पहाटेपर्यंत दोन्ही वनपरिक्षेत्रात एकूण ४७ वानर, १० बिबट, १४ तरस, ३२ सांबर, १७ कोल्हे, २५ रानडुक्कर, ३४ सांबर, ४३ माकड, १६ भेकर, १४ उदमांजर, ९ तरस, ३ रानकोंबडे व इतर मिळून दोन्ही अभयारण्यात एकूण ३१७ वन्य प्राण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.