Balrangbhumi Parishad | बालरंगभूमी परिषदेचे ‘हसत खेळत बालनाट्य’  शिबिराचा उत्साहात प्रारंभ

0

Balrangbhumi Parishad | नगर : बालरंगभूमी परिषद, (Balrangbhumi Parishad) अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा शाखेतर्फे १३ दिवसांचे “बालनाट्य शिबिर” दिनांक ५ ते १७ मे २०२६ या कालावधीत होणार आहे. हे शिबिर कालपासून (ता. ५) सुरू झाले आहे. यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन देखील आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हे वाचा – वीरगावच्या युवा शेतकऱ्याचे काकडी उत्पादनात दमदार यश

अनेक कलावंतांना याचा फायदा (Balrangbhumi Parishad)

बालरंगभूमी परिषदेच्या वतीने दरवर्षी नाट्य शिबिराचे आयोजन केले जाते. अनेक बालकलाकार या कार्यशाळेत सहभागी होतात. बाल कलावंतांना व बाल राज्यनाट्य स्पर्धेतील अनेक कलावंतांना याचा फायदा होत असतो. या कार्यशाळेत नाट्यकलेतील सर्व प्रकार,नृत्य, चित्रकला यांचे प्रशिक्षण देण्यात येते. यंदाच्या वर्षी या शिबिरातील बाल कलावंतांचे व्यावसायिक बालनाट्य सादर केले जाणार आहे. या बालनाट्याचा प्रयोग १७ मे रोजी माऊली सभागृहात होणार आहे.

अवश्य वाचा- अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

उद्याचे नाट्यकर्मी घडणार (Balrangbhumi Parishad)

नाट्यपरिषद मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष व बालरंगभूमी परिषद मुंबईचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके तसेच अभिनेते संकेत खेडकर, अभिनेते सृज्ञ टोंपे, चित्रकार सुजाता पायमोडे, नृत्य दिग्दर्शक सागर अलचेट्टी, दिग्दर्शक शैलेश देशमुख हे नाट्य, नृत्य, चित्र विषयक मार्गदर्शन करणार आहेत. या बाल कलाकारांमधूनच उद्याचे नाट्यकर्मी घडणार आहेत. शिबिरातील बाल कलाकारांचे विविध प्रकारचे सादरीकरण पाहण्यासाठी आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी १७ मे रोजी उपस्थित रहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे पहा – आदिनाथ महाराज शास्त्रींनी स्वतःवरच वार का केले? कारण आलं समोर…

या शिबिरात सहभागी होणाऱ्या  बाल कलाकारांची कला नगर जिल्ह्यातील बाल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या बालनाट्यांचे प्रयोग जिल्हाभर होणार असल्याचे सतीश लोटके व मध्यवर्ती कार्यकारी मंडळ सदस्य अनंत जोशी यांनी सांगितले. या बाल कलाकारांचे कौतुक करण्यासाठी नगरकरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद भणगे यांनी केले आहे. शिबिर संयोजक सपना साळुंके, श्रीया देशमुख, विराज अडगटला, सोनाली दरेकर, तेजा पाठक, नाना मोरे परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here