Cucumber production: वीरगावच्या युवा शेतकऱ्याचे काकडी उत्पादनात दमदार यश

काकडीसारख्या भाजीपाला पिकांसाठी शेडनेट शेती फायदेशीर

0

Cucumber production:अकोले: तालुक्यातील वीरगाव येथील युवा शेतकरी सुनील वाघ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेडनेटमध्ये काकडी उत्पादन
(Cucumber production)
करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून त्यांनी केलेला हा प्रयोग सध्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सुनील वाघ यांनी सुमारे एक एकरावरील शेडनेटमध्ये काकडी पिकाची लागवड केली आहे. त्यासाठी बियाणे, खते, औषधे आणि मजुरी असा सुमारे दोन लाख रुपये खर्च केला आहे. योग्य नियोजन, आधुनिक पद्धतींचा अवलंब आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी अल्पावधीत चांगले उत्पादन मिळवले आहे. आत्तापर्यंत काकडीचे 10 तोडे पूर्ण झाले असून सुमारे 18 टन उत्पादन मिळाले आहे. विशेष म्हणजे अजून सुमारे 20 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा- अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

काकडीसारख्या भाजीपाला पिकांसाठी शेडनेट शेती फायदेशीर (Cucumber production)

सध्या बाजारात काकडीला प्रतिकिलो सुमारे 17 रुपये दर मिळत असल्याने त्यांनी केलेला सुरुवातीचा खर्च पूर्णपणे वसूल झाला आहे. पुढील सर्व उत्पादन हे नफा म्हणून मिळणार असल्याने त्यांच्या या प्रयोगाला आर्थिकदृष्ट्याही मोठे यश मिळत आहे.शेडनेटमुळे पिकावर होणारा उष्णतेचा व वातावरणातील बदलांचा परिणाम कमी होतो, तसेच पाण्याचा योग्य वापर होऊन उत्पादनात वाढ होते. यामुळे काकडीसारख्या भाजीपाला पिकांसाठी शेडनेट शेती फायदेशीर ठरत असल्याचे वाघ यांनी सांगितले. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी शेडनेट शेतीकडे वळण्याचा विचार करत असून, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन आणि चांगला आर्थिक परतावा मिळवण्याचा मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे. त्यांची ही यशोगाथा आधुनिक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.