Ahilyanagar District Cooperative Bank : जिल्हा बँकेवर अखेर प्रशासक; विशेष लेखा परिक्षक निकाळजे यांनी स्वीकारला पदभार

Ahilyanagar District Cooperative Bank : जिल्हा बँकेवर अखेर प्रशासक; विशेष लेखा परिक्षक निकाळजे यांनी स्वीकारला पदभार

0

Ahilyanagar District Cooperative Bank : नगर : अहिल्यानगरच्या जिल्हा सहकारी बँकेवर (Ahilyanagar District Cooperative Bank) प्रशासक नियुक्तीचे आदेश सहकार खात्याच्या (Department of Cooperation) वतीने काढण्यात आले. प्रशासक (Administrator) म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलल्या(Ahilyanagar District Cooperative Bank)

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची फेब्रुवारी २०२६ म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच मुदत संपली होती. त्यानंतर सत्ताधारी दिवंगत अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले पाटील यांच्याकडे अध्यक्ष पद कायम होते. सहकार खात्याने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील सहकार विभागाच्या निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. यामुळे जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील तीन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान सहकार खात्याने मंगळवार (ता.५) रोजी सायंकाळी प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले.

नक्की वाचा: स्वगणनेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : सभापती प्रा. राम शिंदे