Adulterated Onion Seeds : भेसळयुक्त कांदा बियाणे विक्रीप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Adulterated Onion Seeds : भेसळयुक्त कांदा बियाणे विक्रीप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

0
Adulterated Onion Seeds : भेसळयुक्त कांदा बियाणे विक्रीप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Adulterated Onion Seeds : भेसळयुक्त कांदा बियाणे विक्रीप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Adulterated Onion Seeds : नगर : रब्बी कांदा बियाण्यामध्ये खरीप कांद्याच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणात भेसळ (Adulterated Onion Seeds) करून शेतकऱ्यांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी एका बियाणे उत्पादक कंपनीविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargaon Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार निवारण समितीच्या तपासणीत बियाण्यात तब्बल ८२ टक्के भेसळ आढळून आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

नक्की वाचा: हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

तक्रार निवारण समितीने भेट देत केली तपासणी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील १० कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ता. ६ एप्रिल २०२६ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संबंधित कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने ता. १३ एप्रिल रोजी क्षेत्रभेट देत तपासणी केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

परवान्यात नमूद नसलेल्या वाणांची विक्री (Adulterated Onion Seeds)

तपासणीदरम्यान कंपनी प्रतिनिधींकडे बियाण्यासंदर्भातील कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्यावेळी कंपनीने परवान्यात नमूद नसलेल्या वाणांची शेतकऱ्यांना विक्री केल्याचे निदर्शनास आले. तसेच बिलावरील माहिती आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या बियाण्यामध्ये तफावत असल्याचेही स्पष्ट झाले.

याशिवाय संबंधित कंपनीकडे किरकोळ बियाणे विक्रीचा परवाना नसतानाही थेट शेतकऱ्यांना बियाणे विक्री करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. तक्रार निवारण समितीच्या अहवालात बियाण्यात ८२ टक्के भेसळ आढळल्याने कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली. त्यानुसार ता. ६ मे २०२६ रोजी संबंधित कंपनीचे संचालक व प्रतिनिधी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.