Tofkhana Police Station : नगर : अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील (Ahilyanagar-Manmad Highway) झेड. के. बॉलीवुड कॅफे येथे बेकायदेशीररित्या (Illegal) सुरू असलेल्या कथित ‘कॅफे’वर तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Tofkhana Police Station) पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत कॅफेमध्ये अश्लिल कृत्यांसाठी तयार केलेले बंदिस्त कप्पे आढळून आले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
यांच्याविरूध्द नोंदविला गुन्हा
छाप्यावेळी काउंटरवर उपस्थित असलेल्या स्वप्निल शंकर डोंगरे (वय २५, रा. मानपाडा, कल्याण) याने स्वतःला कॅफेचा मालक असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्यासह ऋषिकेश सातपुते (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अश्लिल कृत्यांसाठी उपलब्ध करून दिली जागा (Tofkhana Police Station)
पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सावेडी परिसरातील सदर कॅफेमध्ये प्लायवुडचे लहान-लहान कप्पे तयार करून त्यांना पडदे लावण्यात आले आहेत. या कप्प्यांमध्ये शाळा व महाविद्यालयीन तरूण-तरूणींना अश्लिल कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. या बाबत पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या पथकाणे कारवाई केली.



