Caught in Anti-Corruption Trap : जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Caught in Anti-Corruption Trap : जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

0
Caught in Anti-Corruption Trap : जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
Caught in Anti-Corruption Trap : जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Caught in Anti-Corruption Trap : नगर – तक्रारारदार यांचा मुलगा व मुलीच्या दोन जन्म दाखल्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना अहिल्यानगर येथिल लाचलुचपत प्रतिबंधक (Caught in Anti-Corruption Trap) विभागाने जामखेड नगरपरिषदेच्या (Jamkhed Municipal Council) दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. अभिजीत जालिम भैसडे (वय 39, लिपिक, जन्म-मृत्यू नोंदणी (Birth and Death Registration) विभाग), अहमद इलियास शेख (वय 43, मदतनीस, अग्निशामक दल, कंत्राटी) अशी कर्मचार्‍यांची नावे आहेत.

नक्की वाचा: हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

याबाबत अधिक माहिती अशी की,

२६ नोव्हेंबर २०२५ रोजी जामखेड नगरपरिषद येथे त्यांचा मुलगा व मुलगी यांचे जन्म दाखला मिळवा याकरता आवश्यक कागदपत्रे जोडुन व अर्ज देऊन नगरपरिषद विभागाच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागाचे कर्मचारी अभिजीत भैसडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी कर्मचारी भैसडे यांनी दुसरा अग्नीशामक विभागाचा कंत्राटी कर्मचारी अहमद इलियास शेख, यांची भेट घेण्यास सांगितले. तक्रारदार यांनी शेख यांची भेट घेतल्या नंतर कर्मचारी अभिजीत भैसडे यांच्यासाठी प्रत्येक दाखल्याचे १५०० रु या प्रमाणे दोन जन्म दाखल्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

3,000 ची लाच घेताना रंगेहाथ पकडले (Caught in Anti-Corruption Trap)

प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत शेख याला 3,000 रूपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. भैसडे याने शेख याला लाच घेण्यासाठी कारवाई प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, चंद्रकांत भिमसेन काळे, किशोर विठठल कुळधर, शेखर बाळासाहेब वाघ, दशरथ भिमराव लाड यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here